KKR Seo on Rohit Sharma Abhishek Nayar Video: आयपीएल२०२४ मध्ये ११ मे रोजी कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना झाला होता. या सामन्याच्या दिवसांमध्ये केकेआरने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला, जो व्हायरल झाला होता.या व्हिडिओमध्ये केकेआरचे सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर आणि मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा बोलताना दिसत होते. हे दोघे मुंबई इंडियन्स संघामधील होणाऱ्या बदलांवर बोलत होते, असे यावरून वाटत होते. आता या व्हीडिओमध्ये रोहित आणि अभिषेक कोणत्या विषयावर बोलत होते, याबाबत केकेआरच्या सीईओने सांगितले आहे. रोहित-अभिषेकचा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर केकेआऱने हा व्हीडिओ डिलीटही केला.

रोहित शर्माला मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरून हटवल्यापासून फ्रँचायझी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघ २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० मध्ये चॅम्पियन बनला आहे. हार्दिक पंड्याला गुजरात टायटन्समधून मुंबई इंडियन्सने लिलावापूर्वी ट्रेड केले आणि त्यानंतर हार्दिक पंड्याला मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनवण्यात आले. २०२२ च्या मेगा लिलावादरम्यान हार्दिकने मुंबई सोडली होती. यानंतर, तो २०२२ मध्ये गुजरात टायटन्समध्ये सामील झाला आणि पहिल्याच सत्रात त्याने संघाला चॅम्पियन बनवले. २०२३ मध्ये पांड्याच्या नेतृत्वाखाली संघाने अंतिम फेरी गाठली होती.

Rohit Surya Tilak Varma Leaves as Hardik pandya Comes to bat As Per Reports
IPL 2024: हार्दिकला येताना पाहताच रोहित-सूर्या-तिलक उठून गेले? मुंबई इंडियन्स संघातील वाद पुन्हा चव्हाट्यावर
Video Neeta Ambani Requesting Chats With Rohit Sharma
नीता अंबानी रोहित शर्माला काय म्हणाल्या? मुंबईच्या दहाव्या पराभवानंतर ‘ते’ संभाषण कॅमेऱ्यात कैद, Video पाहा
Sachin Tendulkar Son Arjun Tendulkar Aggression
२ चेंडूंवर, २ षटकार व सचिन तेंडुलकरच्या लेकाची माघार; अर्जुनला खुन्नस देणं पडलं महाग, MI vs LSG ची नाट्यमय ओव्हर पाहा
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
Hardik Pandya Shouted on Jasprit Bumrah Video
IPL 2024: हार्दिक पंड्या भर मैदानात बुमराहवर ओरडला, निराश झालेल्या जसप्रीतने दिली अशी प्रतिक्रिया; Video व्हायरल
IPL 2024 Playoffs Scenario for RCB
IPL 2024: १८ धावा किंवा १८.१ षटके… आरसीबी की चेन्नई कोण गाठणार प्लेऑफ, वाचा कसं आहे समीकरण?
Shikhar Dhawan and Mithali Raj Marriage Talks
‘मी मिताली राजशी लग्न करत आहे…’, शिखर धवनचा मोठा खुलासा, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण?
Ravichandran Ashwin Calls Sanju Samson Selfish After RR Captain Selected For T20 World Cup
“तो स्वार्थीपणे खेळतोय..”, अश्विनने संजु सॅमसनची विश्वचषकाच्या संघात निवड होताच केलं मोठं विधान; म्हणाला,”त्याची गरज..”

हेही वाचा- IPL 2024: हार्दिकला येताना पाहताच रोहित-सूर्या-तिलक उठून गेले? मुंबई इंडियन्स संघातील वाद पुन्हा चव्हाट्यावर

मुंबईने रोहितकडून कर्णधारपद काढून घेतल्यापासून रोहितने फ्रँचायझी किंवा इतर कोणत्याही गोष्टीबाबत कोणतेही वक्तव्य केलेले नाही. पण रोहितच्या कर्णधारपदावर एकदा इन्स्टाग्रामवर कमेंट करण्यात आली होती. पण मुंबई-केकेआर मॅचदरम्यान रोहित शर्मा अभिषेक नायरशी बोलताना दिसला. यामध्ये रोहित म्हणत होता की प्रत्येक गोष्ट बदलत आहे. ते त्यांच्यावर अवलंबून आहे. मी या सर्व गोष्टींकडे लक्ष देत नाही. बाकी काहीही असो ते माझं घर आहे. मी ते बांधलेले मंदिर आहे. माझे काय? माझे शेवटचे आहे.

पण आता केकेआरचे सीईओ वेंकी म्हैसूर यांनी यावर वक्तव्य केले आहे. रेव्हस्पोर्ट्जच्या पोडकास्टध्ये सांगितले की, “मला याबाबत फार काही माहिती नव्हते, हे फक्त चहाच्या कपातील वादळ आहे. अभिषेक आणि रोहित खूपच जुने मित्र आहेत, त्यांची मैत्री खूपच जास्त जुनी आहे. पण ते दोघे जे काही बोलत होते त्याबद्दला कोणीतरी खोटी अफवा पसरवली आहे. मी त्या दोघांशी बोललो. त्यावेळी दोघेही काहीतरी वेगळ्या विषयावर बोलत होते. काही लोकांकडे खूपच मोकळा वेळ असतो.” रोहित शर्मा आणि अभिषेक नायर फार पूर्वी हे मुंबईकडून देशांतर्गत क्रिकेट खेळले आहे आणि हे दोघेही खूप चांगले मित्र आहेत.