IPL 2024, Lucknow Super Giants vs Punjab Kings: लखनऊ सुपर जायंट्सचा पदार्पणवीर मयंक यादवने आपल्या भेदक गोलंदाजीने सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे. मयंक यादवने पंजाब किंग्सविरूद्धच्या सामन्यात आयपीएलमध्ये पदार्पण केले आणि या पहिल्याच सामन्यात त्याने आपली छाप पाडली. शानदार आणि अचूक गोलंदाजीच्या जोरावर त्याने पंजाब संघाचे तीन मोठे विकेट्स मिळवले. इतकेच नाही तर त्याने यंदाच्या आयपीएलमधील सर्वात वेगवान चेंडूही टाकला, ज्याचा वेग १५५.८ किमी प्रति तासइतका होता.

लखनऊ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत १९९ धावा केल्या. २०० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब किंग्जची सुरुवात जबरदस्त झाली. शिखर धवन आणि जॉनी बेअरस्टो यांनी पहिल्या विकेटसाठी १०२ धावांची भागीदारी केली. कोणत्याच गोलंदाजाला विकेट घेण्यात यश मिळत नव्हतं पण पदार्पणाचा सामना खेळत असलेल्या मयंक यादवने ही भागीदारी तोडली.

What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
raj thackeray amit shah (
भाजपाने मनसेला नेमकी काय ऑफर दिलेली? राज ठाकरे म्हणाले, “त्यांनी मला सांगितलं…”
Uddhav Thackrey Kundli Shine In Loksabha Elections Till 2027
“उद्धव ठाकरेंच्या पत्रिकेतच पुरावा, लोकसभेत शिवसेनेला..”, ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी
Jake Fraser Mcgurk Statement on Jasprit Bumrah
IPL 2024: जेक फ्रेझरचे बुमराहविरूद्धच्या फटकेबाजीवर मोठे वक्तव्य, म्हणाला ‘मी दिवसभर बुमराहच्या गोलंदाजीचे …’

आयपीएल २०२४ मधील सर्वात वेगवान चेंडू १५५.८ किमी प्रति तास

मयंकने १२व्या षटकातील चौथ्या चेंडूवर जॉनी बेअरस्टोला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. या षटकात मयंकच्या वेगानं कहर केला. त्याने षटकातील पहिला चेंडू १५५.८ किमी प्रतितास वेगाने टाकला. आयपीएल २०२४ मध्ये आतापर्यंत टाकलेला हा सर्वात वेगवान चेंडू आहे. याशिवाय मयंक यादव आयपीएलमध्ये १५५ पेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी करणारा दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी उमरान मलिकने १५७ किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी केली होती.

पदार्पणाच्या सामन्यातच ३ विकेट

पदार्पणाच्या सामन्यात मयंक यादवने शानदार गोलंदाजी केली. त्याने सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स संघाला सामन्यात परत आणले. मयंक यादवने ४ षटकात ६.८ च्या इकोनॉमीने केवळ २७ धावा देत ३ महत्त्वाचे विकेट संघाला मिळवून दिले. मयंकने पंजाबच्या आघाडीच्या फलंदाजांना झटपट पॅव्हेलियनमध्ये धाडले. या वेगवान गोलंदाजाने भेदक गोलंदाजी करत जॉनी बेअरस्टो (४२), प्रभसिमरन सिंग (१९) आणि यष्टिरक्षक जितेश शर्मा (६) यांना आपल्या वेगवान गोलंदाजीसमोर टिकू दिले नाही.

मयंक यादवची क्रिकेट कारकीर्द

मयंक यादव देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्लीचे प्रतिनिधित्व करतो. उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज मयंक यादवला लखनऊ सुपर जायंट्सने २०२३ च्या लिलावात त्याच्या मूळ किमतीत म्हणजेच २० लाख खर्चून खरेदी केले. २१ वर्षीय मयंक यादव २०२२ पासून लखनऊ सुपर जायंट्समध्ये आहे. गेल्या तीन हंगामात लखनऊने त्याला प्रत्येकी २० लाख रुपये किमतीत कायम ठेवले आणि आता त्याला पदार्पणाची संधी दिली आहे. मयंक यादवने आपल्या टी-२० कारकिर्दीत आतापर्यंत १० सामने खेळताना १२ विकेट घेतल्या आहेत.

मयंकने आपल्या लिस्ट-ए कारकिर्दीत १७ सामन्यात ३४ विकेट घेतल्या आहेत. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२३-२४ च्या उपांत्य फेरीत दिल्लीकडून खेळताना त्याने पंजाबविरुद्धच्या सामन्यात २ महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या, पण संघाला अंतिम फेरीत नेऊ शकला नाही.