Prithvi Shaw Gulabi Saree Song Video: “गुलाबी साडी आणि लाली लाल लाल…” हे गाणं सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच जण या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. सध्या सगळीकडेच गाजत असलेल्या या गाण्याने आयपीएलमधील ही प्रवेश केला आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाचा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉचा या गाण्यावरील व्हीडिओ व्हायरल होत आहे. दिल्ली कॅपिटल्सने स्वत हा व्हीडीओ शेअर केला आहे.

पृथ्वी शॉ दिल्लीच्या संघासोबत प्रवास करताना आणि फोटोशूट करतानाचा हा व्हीडिओ आहे. शॉ या गाण्यावर थिकरतानाही दिसला. शॉ प्रवासामध्ये गाणं ऐकत असतो आणि तेव्हाच त्याला व्हीडिओ शूट करणारा सहकारी विचारतो, तू कुठलं गाणं ऐकतो आहेस? शॉ उत्तर देताना म्हणाला, गुलाबी साडी आणि लाली लाल लाल…आणि हे गाणं सांगतानाही तो त्या गाण्याची स्टेप करताना दिसला. यानंतर त्याचे फोटोशूटचे काही फोटोस यामध्ये आहेत, त्यावेळेसही या गाण्यावरचे स्टेप्स तो करताना दिसत आहे. दिल्लीने शेअर केलेल्या या व्हीडिओवर अनेक कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. शॉचा हा व्हीडिओही चांगला व्हायरल झाला आहे.

a cheetah attacked on a pakistani man
Viral Video : धक्कादायक! पाकिस्तानी तरुणावर चित्त्याने केला हल्ला, व्हिडीओ पाहून येईल अंगावर काटा
snake attack on a man wrap around door handle
जरा सांभाळून! दरवाज्याचे हँडल पकडताच सापाने केला हल्ला, थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
boy dance in mumbai local train on gulabi saree
VIDEO : काय ती अदा, काय ते भुरभुरे केस! मुंबई लोकलमध्ये ‘गुलाबी साडी’ गाण्यावर तरुणाचा जबरदस्त डान्स, पाहून प्रवासी थक्क
Anushka Sharma Namaste Celebration Viral on RCB Win
IPL 2024: आरसीबीने दिल्लीवर विजय मिळवताच अनुष्का शर्माने जोडले हात, भन्नाट प्रतिक्रियेचा VIDEO व्हायरल
Watch Jasprit Bumrah clean bowled to Sunil Narine
KKR vs MI : बाहेर जाणाऱ्या चेंडूने हवेत बदलला काटा, बुमराहच्या यॉर्करने उडवला सुनील नरेनचा त्रिफळा, पाहा VIDEO
Nitish Kumar Reddy Takes Quinton De Kock
SRH vs LSG : नितीश कुमार रेड्डीने सीमारेषवर अप्रतिम झेल पकडत चाहत्यांना केले आश्चर्यचकित, पाहा VIDEO
Is Vada Pav Girl arrested Delhi Police reveals truth behind Chandrika Dixit's viral video
Viral Vada Pav Girl चंद्रिका दीक्षितच्या अटकेबाबत दिल्ली पोलिसांनी केला खुलासा! वाचा, व्हायरल व्हिडीओचे सत्य
Mumbai Indians captain Hardik Pandya arguing with umpire
DC vs MI : दिल्लीच्या फलंदाजांनी धुलाई केल्यानंतर हार्दिक पंड्या अंपायरवर संतापला, काय होत कारण?

यंदा पृथ्वी शॉ चांगल्या फॉर्मात असून दिल्लीसाठी तो सातत्याने धावा करत आहे. शॉने ४ सामन्यांमध्ये एकूण १५१ धावा केल्या आहेत, यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट १६०च्या आसपास राहिला आहे. शॉ यंदा सातत्याने धावा करत असून तो फॉर्मात परतला आहे. दिल्ली कॅपिटल्सची यंदाच्या आयपीएलमधील कामगिरी फारशी चांगली राहिलेली नाही. दिल्लीने आतापर्यंत ६ सामन्यांपैकी फक्त २ सामने जिंकले आहेत, तर ४ सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. दिल्लीचा संघ गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे. दिल्ली कॅपिटल्सचा पुढील सामना आता बुधवारी गुजरात टायटन्स विरूध्द होणार आहे.