Rajasthan Royals vs Sunrisers Hyderabad IPL 2024 Qualifier 2 Highlights: आयपीएल २०२४ च्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सचा ३६ धावांनी पराभव करून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर, हेनरिक क्लासेनच्या अर्धशतकाच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने २० षटकांत ९ गडी गमावून १७५ धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्स संघाला ध्रुव जुरेलच्या झंझावाती अर्धशतकी खेळीनंतरही २० षटकांत ७ गडी गमावून केवळ १३९ धावा करता आल्या. सनरायझर्स हैदराबादकडून फिरकीपटूंनी दमदार खेळी करत संघाला विजय मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली. शाहबाज अहमदने तीन, अभिषेकने दोन आणि कमिन्स-नटराजनने प्रत्येकी एक विकेट घेतली. शाहबाज अहमदला या सामन्याचा सामनावीर म्हणून निवडण्यात आले.

सनरायझर्स हैदराबादचा संघ आता रविवारी २६ मे रोजी एम ए चिदंबरम स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्सविरूद्ध अंतिम सामना खेळणार आहे.

Live Updates

RR vs SRH Highlights, IPL 2024 Qualifier 2: सनरायझर्स हैदराबादचा संघ आयपीएल २०२४ च्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये राजस्थानचा पराभव करत अंतिम सामन्यात पोहोचली आहे.

23:19 (IST) 24 May 2024
RR vs SRH Qualifier 2: सनरायझर्स हैदराबादचा संघ फायनलमध्ये

हैदराबादच्या फिरकी गोलंदाजांच्या शानदार कामगिरीसह हैदराबादने राजस्थानवर ३६ धावांनी विजय मिळवला आहे. यासह २०१८ नंतर हैदराबादचा संघ फायनलमध्ये पोहोचला आहे. २६ मे रोजी केकेआरविरूद्ध हैदराबाद अंतिम सामना खेळवला जाईल

23:11 (IST) 24 May 2024
RR vs SRH Qualifier 2: ध्रुव जुरेलचे झंझावाती अर्धशतक

ध्रुव जुरेलने सुरूवातीपासूनच आक्रमक फलंदाजी करत अवघ्या २६ चेंडूत २ षटकार आणि ६ चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले. पण ध्रुवला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही.

23:08 (IST) 24 May 2024
RR vs SRH Qualifier 2: रोव्हमन पॉवेल झेलबाद

१८ व्या षटकातील चौथ्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात रोव्हमन पॉवेल झेलबाद झाला. आता अखेरच्या दोन षटकात राजस्थानला ५२ धावांची गरज आहे.

23:04 (IST) 24 May 2024
RR vs SRH Qualifier 2: राजस्थानला १८ चेंडूत ५३ धावांची गरज

राजस्थानकडून ध्रुव जुरेल आणि पॉवेल मैदानात आहेत. राजस्थानला विजयासाठी १८ चेंडूत ५३ धावांची गरज आहे.

23:01 (IST) 24 May 2024
RR vs SRH Qualifier 2: १६ षटकांनंतर राजस्थान

१६ षटकांनंतर राजस्थानची धावसंख्या ६ बाद १०२ धावा आहे. ध्रुव जुरेल आणि रोव्हमन पॉवेल मैदानात कायम आहेत.

22:46 (IST) 24 May 2024
RR vs SRH Qualifier 2: राजस्थानच्या आशांवर अभिषेक शर्माने फेरले पाणी

१४ व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर अभिषेक शर्माने राजस्थानचा मोठा फलंदाज शिमरॉन हेटमायरला क्लीन बोल्ड करत राजस्थानच्या आशांवर पाणी फेरले आहे. अवघ्या ४ धावा करत हेटमायर बाद झाला. तर राजस्थानला अजूनही १०० धावांचा पल्ला गाठता आला नाही.

22:38 (IST) 24 May 2024
RR vs SRH Qualifier 2: शाहबाजच्या एका षटकात दोन धक्के

शाहबाजने १२व्या षटकात पहिल्याच चेंडूवर रियान परागला झेलबाद केले. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात चेंडू हवेत उंच गेला आणि अभिषेक शर्माने झेल टिपला. तर चौथ्या चेंडूवर अश्विन खातेही न उघडता बाद झाला. यासह १२ षटकांनंतर राजस्थानची धावसंख्या ५ बाद ८० धावा आहे.

https://x.com/IPL/status/1794053428521381943

22:26 (IST) 24 May 2024
RR vs SRH Qualifier 2: यशस्वीनंतर संजूही आऊट

नवव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर अभिषेकने संजू सॅमसनला बाद करत मोठी विकेट संघाला मिळवून दिली. मोठा फटका खेळण्याच्या नादात मारक्रमने एक शानदार झेल टिपला. संजूने ११ चेंडूत एका चौकारासह १० धावा केल्या.

22:22 (IST) 24 May 2024
RR vs SRH Qualifier 2: राजस्थानला दुसरा धक्का

शाहबाज अहमदच्या आठल्या षटकातील पाचव्या चेंडूवर झेलबाद झाला. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात यशस्वी सीमारेषेजवळ झेलबाद झाला. बाद होण्यापूर्वी यशस्वीने २१ चेंडूत ३ षटकार आणि ४ चौकारांसह ४२ धावा केल्या. यासह आठ षटकारांनंतर २ बाद ६६ धावा आहे.

22:15 (IST) 24 May 2024
RR vs SRH Qualifier 2: राजस्थानची धावसंख्या ५० धावा पार

पहिला धक्का बसला तरी यशस्वी जसवालने राजस्थानचा डाव आटोक्यात ठेवला आणि पॉवरप्लेच्या अखेरीस धावसंख्या ५० धावा पार केली. राजस्थानने सहा षटकांत एका विकेटच्या मोबदल्यात 51 धावा केल्या आहेत. सहावे षटक टाकायला आलेल्या भुवनेश्वर कुमारवर यशस्वीने तीन चौकार आणि एक षटकार ठोकला आणि या षटकातून १९ धावा केल्या. यशस्वी 15 चेंडूत 33 धावा केल्यानंतर क्रीजवर उपस्थित आहे आणि सॅमसनने 6 धावा केल्या आहेत

22:13 (IST) 24 May 2024
RR vs SRH Qualifier 2: राजस्थानला पहिला धक्का बसला

हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने सलामीवीर टॉम कोहलर कॅडमोरला बाद करून राजस्थानला पहिला धक्का दिला. कॅडमोर 10 धावा करून बाद झाला. यशस्वी जैस्वाल क्रीजवर उपस्थित असून कर्णधार संजू सॅमसन त्याला साथ देण्यासाठी आला आहे.

21:38 (IST) 24 May 2024
RR vs SRH Qualifier 2: राजस्थानच्या डावाला सुरूवात

हैदराबादने दिलेल्या १७६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी यशस्वी जैस्वाल आणि कोहलर कॅडमोरची जोडी मैदानात उतरली आहे. तर भुवनेश्वर कुमार गोलंदाजीला सुरूवात करत आहे.

21:23 (IST) 24 May 2024
RR vs SRH Qualifier 2: राजस्थानला इतक्या धावांचे लक्ष्य

राजस्थानला विजयासाठी १७६ धावांचे लक्ष्य दिले आहे. आवेश खान आणि ट्रेंट बोल्टने प्रत्येकी ३ विकेट घेतले आणि हैदराबादच्या धावांना वेसण घातले. तर संदीप शर्माने महत्त्वाच्या २ विकेट्स घेतल्या. राहुल त्रिपाठी(३४) , ट्रेव्हिस हेड (३४) आणि क्लासेनचच्या अर्धशतकाच्या जोरावर ९ बाद १७५ धावा केल्या. अभिषेकने पहिल्या षटकात १२ धावा केल्या पण त्य़ाच षटकात विकेट गमावली. त्यानंतर राहुल त्रिपाठीने ३७ धावा करत डाव उचलून धरला. पण बोल्टने एकाच षटकात त्रिपाठी आणि मारक्रमला बाद करत पुन्हा दबाव आणला. त्यानंतर हेडने फटकेबाजी सुरू केली पण संदीप शर्माने त्याला झेलबाद करत परत धावांवर ब्रेक लावला.

क्लासेनने पुन्हा एकदा एकट्याने संघाचा डाव सावरला आणि महत्त्वपूर्ण धावा करत अर्धशतक झळकावले. संदीप शर्माने त्याचे अर्धशतक होताच गोलंदाजीला आला आणि पहिल्याच चेंडूवर त्याला क्लीन बोल्ड केले. त्यानंतर आवेश खानने विकेट्ची घेण्याची जबाबदारी उचलली. त्याने नितीश रेड्डी, अब्दुल समद आणि शाहबाजला आऊट केले. तर शेवटच्या षटकात शानदार थ्रो करत उनाडकटला धावबाद केले.

21:21 (IST) 24 May 2024
RR vs SRH Qualifier 2: शेवटच्या चेंडूवर धावबाद

शेवटच्या चेंडूवर धाव घेताना जयदेव उनाडकड धावाबाद झाला. आवेश खानच्या परफेक्ट थ्रोने त्रिफळा उडवला.

21:16 (IST) 24 May 2024
RR vs SRH Qualifier 2: शाहबाज अहमद झेलबाद

क्लासेन बाद झाल्याने हैदराबादच्या धावांचे नुकसान झाले आहे. त्यानंतर अखेरच्या षटकात तिसऱ्या चेंडूवर शाहबाज अहमद झेलबाद झाला. आवेश खान या विकेटसह राजस्थान रॉयल्ससाठी आयपीएल २०२४ मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे.

21:13 (IST) 24 May 2024
RR vs SRH Qualifier 2: क्लासेन क्लीन बोल्ड

१९व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर संदीप शर्माने हेनरिक क्लासेनला क्लीन बोल्ड केले. संदीपच्या शानदार चेंडूवर काही कळण्याआधीच क्लासेनचा त्रिफळा उडाला होता. क्लासेनने ३४ चेंडूत ४ षटकारांसह ५० धावा केल्या आणि संघाला १५० धावांचा आकडा पार करून दिला.

20:57 (IST) 24 May 2024
RR vs SRH Qualifier 2: १५ षटकांनंतर हैदराबादची धावसंख्या

१५ षटकांनंतर हैदराबादने ६ बाद १३६ धावा केल्या आहेत. शाहबाज अहमद ५ धावा तर हेनरिक क्लासेन ३७ धावा करत मैदानात आहेत. लागोपाठ गमावलेल्या विकेटमुळे हैदराबादचा संघ मागे पडला आहे. पण क्लासेन मैदानावर असल्याने हैदराबादला सन्मानजनक धावसंख्येची अपेक्षा आहे.

20:42 (IST) 24 May 2024
RR vs SRH Qualifier 2: आवेश खानच्या एका षटकात दोन मोठे विकेट

आवेश खानने १४ व्या षटकात ४ धावा देत दोन मोठे विकेट घेतले आहेत. पाचव्या चेंडूवर त्याने नितीश रेड्डी ५ धावा करत चहलकडून झेलबाद झाला. तर सहाव्या चेंडूवर अब्दुल समद पहिल्याच चेंडूवर गोल्डन डकवर बाद झाला. यासह हैदराबादने १४ षटकांनंतर ६ बाद १२० धावा केल्या आहेत.

20:19 (IST) 24 May 2024
RR vs SRH Qualifier 2: संदीप शर्माच्या खात्यात मोठी विकेट

हैदराबादच्या डावाच्या १० व्या षटकात संदीप शर्माने अखेरच्या चेंडूवर ट्रेव्हिस हेडला बाद केले. संदीप शर्मा षटकात अवघ्या ३ धावा देत मोठी विकेट घेतली. हेडने बाद होण्यापूर्वी २८ चेंडूत ३ चौकार आणि एका षटकारासह ३४ धावा केल्या. हेडने विकेट्सनंतर संघाचा डाव सावरला होता, राजस्थानसाठी ही मोठी विकेट ठरली आहे. हेड बाद होताच काव्या मारन निराश झाली, जिची प्रतिक्रिया सध्या व्हायरल होत आहे.

हैदराबादने १० षटकांत ४ बाद ९९ धावा केल्या आहेत.

https://x.com/_FaridKhan/status/1794017891072774580

20:04 (IST) 24 May 2024
RR vs SRH Qualifier 2: पॉवरप्ले

हैदराबादने तीन विकेट गमावूनही राहुल त्रिपाठीच्या फटकेबाजीच्या जोरावर ३ बाद ६८ धावा केल्या आहेत. ८ चौकार आणि तीन षटकारांसह हैदराबादने इतक्या धावा केल्या आहेत. अभिषेक शर्मा १२ धावा, राहुल त्रिपाठी ३७ धावा तर माक्ररम १ धाव करत बाद झाला.

19:58 (IST) 24 May 2024
RR vs SRH Qualifier 2: बोल्टच्या एकाच षटकात दोन मोठ्या विकेट

बोल्टच्या पाचव्या षटकात राजस्थानला दोन मोठ्या विकेट मिळाल्या आहेत. तिसऱ्या चेंडूवर मैदानात सेट झालेला राहुल त्रिपाठी झेलबाद झाला. तर शेवटच्या चेंडूवर नुकताच मैदानात आलेला एडन माक्ररम १ धाव करत बाद झाला. यासह पाच षटकारानंतर हैदराबादची धावसंख्या ३ बाद ५७ धावा आहे

19:40 (IST) 24 May 2024
RR vs SRH Qualifier 2:राजस्थानच्या खात्यात पहिली विकेट

ट्रेंट बोल्टच्या पहिल्या षटकातील अखेरच्या चेंडूवर बोल्टने अभिषेक शर्माला झेलबाद केले. अभिषेकने ५ चेंडूत एक चौकार आणि षटकारासह १२ धावा केल्या. पहिल्या षटकानंतर १ बाद १३ धावा अशी आहे.

19:37 (IST) 24 May 2024
RR vs SRH Qualifier 2: हैदराबादच्या डावाला सुरूवात

हैदराबादकडून अभिषेक शर्मा आणि ट्रेव्हिस हेडची जोडी मैदानात आली आहे. तर राजस्थानकडून ट्रेंट बोल्ट गोलंदाजीला सुरूवात करेल. तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर अभिषेकने षटकार आणि चौकार लगावला.

19:09 (IST) 24 May 2024
RR vs SRH Qualifier 2: सनरायझर्स हैदराबादची प्लेइंग इलेव्हन:

ट्रेव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, नितीश रेड्डी, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), अब्दुल समद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी नटराजन

19:06 (IST) 24 May 2024
RR vs SRH Qualifier 2: राजस्थान रॉयल्सची प्लेइंग इलेव्हन:

यशस्वी जैस्वाल, टॉम कोहलर-कॅडमोर, संजू सॅमसन (कर्णधार/यष्टीरक्षक), रियान पराग, ध्रुव जुरेल, रोव्हमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल

19:01 (IST) 24 May 2024
RR vs SRH Qualifier 2: नाणेफेक

राजस्थान रॉयल्सने दुसऱ्या क्वालिफायर सामन्याची नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याता निर्णय घेतला आहे. तर हैदराबादचा संघ फलंदाजीने सामन्याला सुरूवात करणार आहे. सनरायझर्सने संघात दोन मोठे बदल केले आहेत. जयदेव उनाडकट आणि एडन मार्करम यांना प्लेईंग इलेव्हनमध्ये पुन्हा संधी देण्यात आली आहे.

18:15 (IST) 24 May 2024
RR vs SRH Qualifier 2: रियान पराग इतिहास रचणार?

राजस्थान रॉयल्सच्या रियान परागला आज इतिहास रचण्याची संधी आहे. जर त्याने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध ५९ धावा केल्या तर तो आयपीएल हंगामात सर्वाधिक धावा करणारा अनकॅप्ड खेळाडू बनेल. गेल्यावर्षी यशस्वी जैस्वालने ६२५ धावा करत हा विक्रम आपल्या नावावर केला होता.

17:59 (IST) 24 May 2024
RR vs SRH Qualifier 2: चहल-अश्विनच्या जोडीवर नजरा

चेपॉकची खेळपट्टी ही फिरकीसाठी चांगली मानली जाते. त्यामुळे राजस्थानची फिरकी जोडी अश्विन आणि चहलवर नजरा असणार आहेत. या मैदानावर आपले बहुतांश क्रिकेट खेळणारा राजस्थान रॉयल्सचा स्टार फिरकीपटू अश्विन याला येथील खेळपट्टीची चांगली माहिती आहे आणि स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यात त्याचा फॉर्म सुधारला आहे. रॉयल्सला आशा आहे की लीगचा सर्वोत्कृष्ट लेग स्पिनर चहलसह तो हेड, अभिषेक आणि क्लासेनवर भारी पडतील.

17:51 (IST) 24 May 2024
RR vs SRH Qualifier 2: हैदराबादच्या विस्फोटक सलामी जोडीवर नजरा

ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांच्या स्फोटक फलंदाजीपुढे विरोधी गोलंदाज गारद झाले आहेत. या जोडीने आक्रमक फलंदाजी करत नवे विक्रम रचले आहेत. हेडने चालू हंगामात १९९.६२ च्या स्ट्राइक रेटने ५३३ धावा केल्या आहेत, तर अभिषेकच्या नावावर २०७.०४ च्या स्ट्राइक रेटने ४७० धावा केल्या आहेत. दोघांनी मिळून आतापर्यंत ७२ षटकार आणि ९६ चौकार लगावले आहेत.

17:49 (IST) 24 May 2024
RR vs SRH Qualifier 2: हेड टू हेड

सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आयपीएलमध्ये आतापर्यंत १९ सामने खेळले गेले आहेत. ज्यात हैदराबादने १० आणि आरआरने ९ सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांनी एकमेकांना अटीतटीची लढत दिली आहे.

RR vs SRH Live, RR vs SRH Live score

Rajasthan Royals vs Sunrisers Hyderabad Live, IPL 2024 Qualifier 2: आयपीएल २०२४ मधील दुसरा क्वालिफायर सामना सनरायझर्स हैदराबाद जिंकला असून संघ केकेआरविरूद्ध फायनल खेळणार आहे. हैदराबादच्या फिरकीपटूंच्या जोरावर राजस्थानचा ३६ धावांनी पराभव केला.