देशभरात आज सगळीकडे रंगपंचमीचा सण साजरा केला जात आहे. भारतीय संघाचा कर्णधार आणि मुंबई इंडियन्सचा आघाडीचा फलंदाज रोहित शर्मानेही रंगपंचमी साजरी केली आहे. ज्याचा व्हिडिओ रोहितने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ३७ वर्षांचा अगदी एखाद्या लहान मुलासारखा या सणाचा मनमुराद आनंद लुटताना दिसत आहे. रोहितने इन्स्टाग्रामवर शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

रोहित शर्माने पत्नी रितिका सजदेह आणि मुलगी समायरासोबत रंगपंचमी खेळताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. रोहितसोबत मुंबई इंडियन्स संघातील काही सहकारीहीया व्हिडिओमध्ये आहेत. रोहित लेकीला आणि पत्नीला रंग लावत आहे. इतकंच नाही तर जमिनीवर पडलेल्या पाण्यात जसं लहान मुलं स्लाईड करतात, अगदी तसंच रोहितने केलं आणि त्याचं पाहून संघातील इतर खेळाडूंनीही त्याची कॉपी केली. रंग खेळण्यात मग्न असलेला रोहित नाचण्याचा आनंद घेतानाही दिसला. रोहितने तर व्हिडीओ रेकॉर्डिंग करणाऱ्या कॅमेरामनलाही पाण्याने आंघोळही घातली.

pune bhel seller old couple video viral
Pune : पुण्यासारखी माणुसकी कुठे सापडेल? भेळ विकणाऱ्या वृद्ध जोडप्याचा VIDEO होतोय व्हायरल
bollywood celebrity charge money for attending funeral
“बॉलीवूड सेलिब्रिटी अंत्यसंस्काराला जायचे पैसे घेतात,” प्रसिद्ध अभिनेत्याचा मोठा दावा; म्हणाला, “तेराव्याला जाण्याचे…”
IPL, GT vs PBKS Preity Zinta Post For Shashank Singh
“IPL लिलावाच्या वेळी झालेल्या चुकीच्या..”, शशांक सिंगबाबत वादावर प्रीती झिंटाने सोडलं मौन, म्हणाली, “आजचाच..”
young woman saved a caged dog in a burning building shocking video goes viral on social media
जीवाची पर्वा न करता तरुणीने वाचवला पेटत्या इमारतीमध्ये फसलेल्या कुत्र्याचा जीव, VIDEO पाहून येईल अंगावर काटा

मुंबई इंडियन्सने दरवर्षीप्रमाणे आयपीएलमधील पहिला सामना गमावत ११ वर्षांपासूनचा हंगामातील सुरूवातीचा सामना हरण्याचा आपला विक्रम कायम ठेवला आहे. नवा कर्णधार हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबईने IPL 2024 मध्ये होलिका दहनाच्या दिवशी गुजरात टायटन्सविरुद्धचा सामना गमावला. रोहित शर्मा आयपीएल २०१३ नंतर प्रथमच कर्णधार नव्हे तर फक्त एक खेळाडू म्हणून उतरला. त्याच्या बॅटमधून धावा आल्या पण तरीही मुंबईचा संघ सामना हरला. गुजरातच्या गोलंदाजांनी मुंबईच्या हातात असलेला विजय हिसकावून घेतला आणि अखेरीस गुजरातने हा सामना ६ धावांनी जिंकला. आता मुंबईचा पुढचा सामना २७ मार्चला सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे.