करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे आयपीएलचा १३वा सीझन सध्या युएईमध्ये सुरु आहे. IPLचे सामने यंदाच्या वर्षी प्रेक्षकांना स्टेडिअममध्ये बसून पाहाता येणार नाहीत. तरी देखील चाहत्यांचा उत्साह मात्र कमी झालेला नाही. किंबहुना दरवर्षी पेक्षा अधिक उत्साहाने लोक IPLचा आनंद घेत आहेत. या उत्साहाच्या वातावरणात सध्या विराट कोहली आणि शाहरुख खानचा एक जुना फोटो जोरदार व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये विराट शाहरुखशी पंगा घेताना दिसत आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हा अत्यंत आक्रमक खेळाडू म्हणून ओळखला जातो. अनेकदा त्याला आपण मैदानावर विरोधी संघातील खेळाडूंशी पंगा घेताना पाहतो. या पार्श्वभूमीवर विराटचा हा फोटो पाहून त्याचं शाहरुखची भांडण झालं होतं की काय? असं वाटतं. परंतु खरं तर असं काहीही घडलं नाही. RCB विरुद्ध KKR मॅच संपल्यानंतर शाहरुख विराटचं कौतुक करण्यासाठी मैदानात आला होता. त्यावेळी त्यांनी थोडी गंमत म्हणून भांडणाचा आव आणला. याक्षणी काढला गेलेला हा फोटो फिल्म फेअरने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर पोस्ट केला आहे. हा फोटो सध्या IPL स्पर्धेच्या निमित्ताने सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
When King Khan met King Kohli! Here’s a candid throwback picture of #ShahRukhKhan and #ViratKohli from #IPL. pic.twitter.com/RR9EORZLDT
— Filmfare (@filmfare) September 22, 2020
IPL 2020 : हैदराबादची हाराकिरी ! हातातला सामना RCB ला केला बहाल
मधल्या फळीतल्या फलंदाजांनी केलेल्या हाराकिरीमुळे हैदराबादला हातात आलेल्या सामन्यावर पाणी सोडावं लागलं आहे. बंगळुरुच्या गोलंदाजांनी मोक्याच्या क्षणी हैदराबादच्या डावाला खिंडार पाडत सामन्यात दमदार पुनरागमन केलं. एका क्षणाला हातातून गमावलेला सामना बंगळुरुने १० धावांनी जिंकला. युजवेंद्र चहलने एकाच षटकात जॉनी बेअरस्टो आणि विजय शंकरला माघारी धाडत बंगळुरुच्या विजयाची पायाभरणी केली. हैदराबादकडून बेअस्टोने धडाकेबाज अर्धशतक झळकावलं, पण त्याची खेळी व्यर्थ गेली. दरम्यान या विजयामुळे कर्णधार विराट कोहलीवर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे.