आयपीएल क्रिकेट म्हणजे फलंदाज आणि गोलंदाज यांना नेत्रदीपक कामगिरी करुन दाखवण्याचे एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे. हीच आपयीएल क्रिकेट स्पर्धा काही दिवसांवर येऊन ठेपली असून येत्या २६ मार्चपासून हा थरार रंगणार आहे. यंदाच्या ट्रॉफीवर आपलेच नाव कोरण्यासाठी प्रत्येक संघाने कंबर कसली आहे. त्यामुळे संघासोबत स्वत:ची कामगिरी उंचावण्याकडे प्रत्येक खेळाडूचे लक्ष्य आहे.
आयपीएल क्रिकेटमध्ये चांगली गामगिरी केली की साहजीकच खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत स्थान मिळण्यासाठीचा मार्ग सुकर होतो. त्यामुळे प्रत्येक खेळाडू चांगली कामगिरी करण्यासाठी प्रयत्न करत असतात. फलंदाज आपल्या बॅटद्वारे जास्तीत जास्त धावा करण्यासाठी झगडत असतात. तर गोलंदाज आपल्या कौशल्याच्या जोरावर बळींची संख्या कशी वाढवता येईल यासाठी प्रयत्नरत असतात. आयपीएलमध्ये सर्वात जस्त धावा तसेच सर्वात जास्त बळी घेणाऱ्या खेळाडूंचा रुबाब काही औरच असतो. अशा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लवकर स्थान मिळते.




आयपीएलच्या इतिहासात सर्वात जास्त धावा कोणी केल्या ?
आयपीएल क्रिकेट ही २० षटकांची स्पर्धा असल्यामुळे येथे अतिशय़ जलद गतीने धावा कराव्या लागतात. त्यामुळे सर्वात जास्त धावा करणाऱ्या खेळाडूला सर्वात सरस खेळाडू अशी बिरुदावली मिळते. आयपीएलच्या इतिहासात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा फलंदाज विराट कोहली याने आतापर्यंत सर्वात जास्त धावा केलेल्या आहेत. त्याने आतापर्यंत १९९ इंनिंग्समध्ये ६२८३ धावा केल्या आहेत. त्याखालोखाल शिखर धवनचा क्रमांक असून त्याने २०८ इनिंग्समध्ये ५७८४ धावा केलेल्या आहेत. त्यानंतर रोहित शर्माचा ने २०० इनिंग्जमध्ये ५६११ धावा करुन सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसरे स्थान मिळवलेले आहे.
सर्वात जास्त धावा केलेल्या खेळाडूंची यादी
>>> विराट कोहली – ६२८३ धावा
>>> शिखर धवन- ५७८४ धावा
>>> रोहित शर्मा – ५६११ धावा
>>> सुरेश रैना- ५५२८ धावा
>>> डेविड वॉर्नर- ५४४९ धावा
>>> एबी डिव्हिलियर्स ५१६२ धावा
दरम्यान, आयपीएल क्रिकेटची सुरुवात २६ मार्चपासून होणार असून पहिल्या दिवशी कोलकाता नाईट रायडर्स गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जशी दोन हात करणार आहे. हा सामना मुंबईत खेळवला जाणार असून पहिल्याच सामन्यात कोणता संघ विजयी होणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.