आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून चेन्नई सुपर किंग्स या संघाने या स्पर्धेत एक वेगळेच स्थान मिळवले आहे. धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नईच्या संघाने दोन वेळा स्पर्धेचे विजेतेपदही पटकावले आहे. मात्र याच संघाकडून आयपीएल खेळणारा एक खेळाडू निवृत्ती स्वीकारणार असल्याचे सांगण्यात येत आहे. इतकेच नव्हे सध्यादेखील या खेळाडूवर समालोचन करण्याची वेळ आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा खेळाडू म्हणजे चेन्नईचा एकेकाळचा तडाखेबाज फलंदाज सुब्रमण्यम बद्रीनाथ. बद्रीनाथ हा लवकरच क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्त होणार असल्याचे वृत्त आहे. पुरेशी संधी न मिळाणारे तो क्रिकेटच्या सर्वच प्रकारातून निवृत्ती स्वीकारणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, सध्या बद्रीनाथ आयपीएलमध्ये क्रिकेट तज्ज्ञ आणि तमिळ समालोचक म्हणून काम पाहत आहे.

चेन्नईच्या यशस्वी वाटचालीत बद्रीनाथचे मोलाचे योगदान होते. ज्या वेळी चेन्नईला चांगल्या भारतीय फलंदाजांची गरज होती, त्यावेळी बद्रीनाथाने आपल्या फलंदाजीच्या जोरावर चेन्नईला अनेक सामने जिंकवून दिले. मात्र नवोदित खेळाडूंचा उदय आणि कामगिरीत सातत्य राखण्यात बद्रीनाथला आलेले अपयश यामुळे त्याला पुरेशी संधी मिळू शकली नाही.

बद्रीनाथ हा प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये तामिळनाडूचा स्टार क्रिकेटपटू आणि कर्णधार होता. मात्र वर्षी काही कारणाने तो प्रथम श्रेणी क्रिकेट स्पर्धांमध्ये सहभागी झाला नाही. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये बद्रीनाथने सुमारे १४ वर्षे तामिळनाडूचे प्रतिनिधित्व केले आणि १० हजार धावांचा टप्पाही पार केला.

बद्रीनाथला भारतीय संघातही स्थान मिळाले होते. मात्र आयपीएलसारखी चमक तो भारतीय संघातून खेळताना दाखवू शकला नाही. २००८ साली श्रीलंकेविरुद्ध त्याने वन-डे क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याच्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झाली. पहिल्याच सामान्य त्याने अर्धशतक झळकावले. मात्र त्यानंतर तशी चमकदार कामगिरी त्याला करता आली नाही आणि त्याने संघातील आपले स्थान गमावले. भारताकडून त्याने केवळ २ कसोटी, ७ वन-डे आणि एकमेव टी२० सामना वेस्ट इंडिजमध्ये खेळला.

मराठीतील सर्व आयपीएल २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Csks s badrinath announcing retirement soon
First published on: 11-05-2018 at 11:43 IST