वय फक्त एक संख्या असते त्यापेक्षा जास्त काहीच नसते हेच ३८ वर्षांच्या ख्रिस गेलने आज दाखवून दिले. वय, फिटनेस आणि फॉर्म याच मुद्यांवरुन ख्रिस गेलला आयपीएलमध्ये कोणी किंमत द्यायला तयार नव्हते. पण त्याच गेलने गुरुवारी सनरायजर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यातून आपल्याला जगातील सर्वात धोकादायक फलंदाज का म्हटले जाते ते दाखवून दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल खेळपट्टीवर असताना वयाचा आणि फिटनेसचा त्याच्या खेळावर कुठे परिणाम होतोय असे कुठेच जाणवले नाही. आयपीएलच्या ११ व्या मोसमातील पहिले शतक झळकावणाऱ्या ख्रिस गेलला सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. सामन्यानंतर बोलताना मुख्य प्रशिक्षक विरेंद्र सेहवाग यांनी अंतिम ११ मध्ये माझी निवड करुन आयपीएलला वाचवले अशी प्रतिक्रिया दिली.

माझा निर्धार पक्का आहे. मला ज्या कुठल्या संघाकडून खेळण्याची संधी मिळाली तिथे मी माझे १०० टक्के दिले. पंजाबचा संघ माझ्यासाठी नवीन आहे. मला अजून बरेच काही सिद्ध करायचे आहे असे अनेक लोक म्हणतील. पण मी असे म्हणीन कि, विरेंद्र सेहवागने माझी निवड करुन आयपीएलला वाचवले. ही एक चांगली सुरुवात आहे असे गेल म्हणाला.

मी गेली अनेक वर्ष भारतामध्ये खेळतोय. त्यामुळे इथले वातावरण, खेळपट्टया कशा असतात त्याची मला चांगली कल्पना आहे. आज शतक ठोकले, आम्ही जिंकलो त्याचा आनंद आहे. मोहालीमधील घरच्या मैदानावरील हा शेवटचा सामना होता. या विकेटची कमतरता मला जाणवेल. मला इथे कोणाला काहीही सिद्ध करायचे नाहीय असे गेल म्हणाला.

Web Title: Virender sehwag has saved ipl
First published on: 20-04-2018 at 03:21 IST