आयपीएलचा तेरावा हंगाम आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सर्व संघ या हंगामासाठी सज्ज झाले असून युएईत सर्वांचा कसून सराव सुरु आहे. सर्व प्रशिक्षक आपापल्या संघातील खेळाडूंकडून प्रत्येक गोष्टीची तयारी करवून घेत आहे. काही दिवसांपूर्वी आयपीएलमध्ये भारतीय प्रशिक्षकांना मिळणारी कमी संधी यावरुन चर्चा रंगली होती. सध्याच्या घडीला किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा अपवाद वगळता इतर सर्व संघांचे मुख्य प्रशिक्षक हे परदेशी आहेत. भारताचे माजी खेळाडू दिलीप वेंगसरकर यांनी आयपीएलमध्ये आता भारतीय प्रशिक्षकांना अधिक संधी देण्याची वेळ आलेली आहे असं वक्तव्य केलंय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“माझ्यामते भारतीय प्रशिक्षकांनी आयपीएलमध्ये संघांना मार्गदर्शन करायला हवं. यापाठीमागचं महत्वाचं कारण म्हणजे त्यांच्याकडे अनुभव आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये ते आपापल्या संघांसोबत चांगली कामगिरी करत आहेत. याव्यतिरीक्त तुम्ही बाहेरील देशांच्या लिगचं उदाहरण घ्या…किती भारतीय प्रशिक्षक काम करताना तुम्हाला पहायला मिळतात?? मग आपण परदेशी प्रशिक्षकांना संधी का द्यायची??” वेंगसरकर यांनी आपलं परखड मत मांडलं.

अवश्य पाहा – IPL 2020 : जाणून घ्या सर्व संघांच्या प्रशिक्षकांचं मानधन…

भारतीय प्रशिक्षकांच्या गुणवत्तेवर मला पूर्ण विश्वास आहे. काही प्रशिक्षक खूप चांगली कामगिरी करत आहेत, काही जणं तर परदेशी प्रशिक्षकांपेक्षा चांगली कामगिरी करत आहेत. भारतीय प्रशिक्षकांना संधी देण्याची हीच योग्य वेळ आहे, ते आपापल्या संघासाठी चांगली कामगिरी करतील याची मला खात्री आहे. भविष्यात भारतीय प्रशिक्षकांना अधिक संधी मिळेल अशी आपल्याला आशा असल्याचं वेंगसरकरांनी सांगितलं.

जाणून घेऊयात आठही संघांचे मुख्य प्रशिक्षक –

मुंबई इंडियन्स – महेला जयवर्धने, चेन्नई सुपरकिंग्ज – स्टिफन फ्लेमिंग, दिल्ली कॅपिटल्स – रिकी पाँटींग, सनराईजर्स हैदराबाद – ट्रेवर बेलिस, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु – सायमन कॅटीच, राजस्थान रॉयल्स – अँड्रू मॅक्डोनाल्ड, कोलकाता नाईट रायडर्स – ब्रँडन मॅक्युलम, किंग्ज इलेव्हन पंजाब – अनिल कुंबळे

मराठीतील सर्व आयपीएल २०२० बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2020 its time we give more opportunity to indian coaches says dilip vengsarkar psd
First published on: 15-09-2020 at 20:28 IST