मुंबई आणि बंगळुरु यांच्यात दुबईच्या मैदानावर रंगलेल्या सामन्यात सुपरओव्हरमध्ये अखेरीस बंगळुरुने बाजी मारली. मुंबईने विजयासाठी दिलेलं ८ धावांचं आव्हान आरसीबीने सहज पूर्ण केलं. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात आरसीबीने अगदी शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. या विजयाबरोबरच विराट कोहलीच्या बंगळुरु संघाने गुणतालिकेमध्ये सातव्या क्रमांकावरुन थेट तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. दरम्यान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने मिळवलेल्या या विजयावर विराट कोहलीची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने आनंद व्यक्त केला आहे. “एका गरोदर बाईसाठी हा खुपच रोमांचित करणारा सामना होता.” अशा आशयाची इन्स्टाग्राम पोस्ट लिहून तिने RCB मधील खेळाडूंचं कौतुक केलं आहे. तिची ही खास पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अवश्य पाहा – VIDEO: संतापलेल्या अभिनेत्याचं शक्ती प्रदर्शन; हातांनीच केले लोखंडी गेटचे दोन तुकडे

अवश्य पाहा – महिला कलाकारांचीच चौकशी का केली जातेय?; अभिनेत्रीचा NCBला सवाल

मधल्या फळीत इशान किशन आणि कायरन पोलार्ड यांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने RCB विरुद्धचा सामना बरोबरीत सोडवण्यात यश मिळवलं. विजयासाठी एका चेंडूत ५ धावांची गरज असताना कायरन पोलार्डने चौकार लगावत सामना बरोबरीत सोडवला. त्याआधी २०२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात खराब झाली होती. कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, क्विंटन डी-कॉक, हार्दिक पांड्या हे सर्व फलंदाज स्वस्तात मागारी परतले होते. परंतू इशान किशन आणि कायरन पोलार्ड यांनी संयमी खेळ करत शतकी भागीदारी केली आणि सामना रंगतदार अवस्थेत आणला. इशान किशनने ५८ चेंडूत २ चौकार आणि ९ षटकारांसह ९९ धावा केल्या. अवघ्या एका धावाने त्याचं शतक हुकलं. पोलार्डने ६० धावा करत त्याला चांगली साथ दिली. आयपीएलच्या तेराव्या हंगामातली ही दुसरी सुपरओव्हर ठरली.

मराठीतील सर्व आयपीएल २०२० बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2020 mumbai indians vs royal challengers bangalore anushka sharma mppg
First published on: 29-09-2020 at 13:40 IST