Irfan Pathan advises Delhi Capitals: आयपीएलचा १६ वा हंगाम दिल्ली कॅपिटल्ससाठी अजिबात चांगला राहिला नाही. या मोसमात प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारा दिल्ली हा पहिला संघ ठरला आहे. अशात आता भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने दिल्ली कॅपिटल्सला एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. त्याने दिल्ली कॅपिटल्सला पुढील सत्रात सौरव गांगुलीला मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी देण्याचा सल्ला दिला आहे.

दिल्ली कॅपिटल्सने मार्च २०२३ मध्ये सौरव गांगुलीची त्यांच्या संघाचे संचालक म्हणून नियुक्ती केली. या अंतर्गत तो संघाच्या वेगवेगळ्या टी-२० लीगमध्ये खेळणाऱ्या सर्व संघांची कामगिरी पाहणार आहे. यामध्ये, महिला प्रीमियर लीगमध्ये सहभागी असलेल्या संघाव्यतिरिक्त, दक्षिण आफ्रिका टी-२० लीगमधील प्रिटोरिया कॅपिटल्स आणि आयएल टी-२० मध्ये सहभागी दुबई कॅपिटल्सचा संघ समावेश आहे.

Tristan Stubbs fielding video viral in DC vs GT Match
DC vs GT : ट्रिस्टन स्टब्सच्या सीमारेषेवरील शानदार फिल्डिंगने सामन्याला दिली कलाटणी, VIDEO व्हायरल
Delhi High Court directs Sports Ministry to clarify stand on suspension of Wrestling Federation of India
भारतीय कुस्ती महासंघाच्या निलंबनासंदर्भात भूमिका स्पष्ट करा! दिल्ली उच्च न्यायालयाची क्रीडा मंत्रालयाला सूचना
IPL 2024 Gujarat Titans vs Punjab Kings Match Updates in Marathi
IPL 2024: मुंबईकर शशांक ठरतोय पंजाब किंग्जचा तारणहार, जाणून घ्या त्याची आजवरची वाटचाल
ipl 2024 rajasthan royals vs delhi capitals
IPL 2024 : पंतच्या नेतृत्वाचा कस! दिल्ली कॅपिटल्ससमोर आज राजस्थान रॉयल्सचे आव्हान; फलंदाजांकडून अपेक्षा

मुख्य प्रशिक्षकाची भूमिका दिल्यास या संघात मोठा बदल दिसून येईल –

इरफान पठाणने स्टार स्पोर्ट्सवरील आपल्या वक्तव्यात म्हटले आहे की, “दिल्ली संघाच्या डगआऊटमध्ये सौरव गांगुलीची उपस्थिती ही मोठी गोष्ट आहे. दादांना या संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची भूमिका दिल्यास या संघात मोठा बदल दिसून येईल, असे मला वाटते. दादांना भारतीय खेळाडूंची मानसिकता चांगलीच ठाऊक आहे. तसेच ड्रेसिंग रूमचे वातावरण कसे हाताळायचे हे त्यांना माहीत आहे. त्यामुळे याचा खरोखरच दिल्लीला खूप फायदा होईल.”

हेही वाचा – LSG vs MI: चमकदार कामगिरीनंतर मोहसीन खानने वडिलांना केला VIDEO कॉल, फोनवर बोलतानाचा फोटो व्हायरल

दिल्लीचा संघ पंजाब आणि चेन्नईचा खेळ खराब करू शकतो –

दिल्ली कॅपिटल्सला या मोसमात अजून २ सामने खेळायचे आहेत. यामध्ये त्यांना एक सामना १७ मे रोजी पंजाब किंग्ज विरुद्ध आणि दुसरा सामना २० मे रोजी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध त्याच्या घरच्या मैदानावर खेळायचा आहे. जर दिल्लीने हे दोन्ही सामने जिंकले, तर पंजाब आणि चेन्नईला प्लेऑफमध्ये स्थान पक्के करणे खूप कठीण होऊ शकते. या मोसमात आतापर्यंत केवळ गतविजेत्या गुजरात टायटन्सलाच प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित करता आले आहे.

हेही वाचा – Phil Simmons: नाइट रायडर्सने बदलला आपला मुख्य प्रशिक्षक; ‘या’ अनुभवी खेळाडूची केली निवड

दिल्ली कॅपिटल्सची यंदाच्या हंगामातील आतापर्यंतची कामगिरी –

आयपीएल २०२३ मध्ये आतापर्यंत दिल्ली कॅपिटल्स संघाने १२ सामने खेळले आहेत. त्यापैकी चार सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला विजय मिळवता आला आहे. त्यामुळे दिल्ली संघाचे आठ गुण आहेत. त्याचबरोबर या संघाला उर्वरित आठ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे हा संघ गुणतालिकेत सर्वात खाली आहे.