Irfan Pathan Shared Video For CSK On Instagram : आयपीएल २०२३ च्या प्ले ऑफ राऊंडचा थरार सुरु झाला आहे. मंगळवारी आयपीएलचा पहिला क्वालिफायर सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात रंगला. या सामन्यात चेन्नईने गुजरातचा १५ धावांनी पराभव करून आयपीएलच्या फायनलमध्ये प्रवेश केला. सीएसकेनं आयपीएलमध्ये आतापर्यंत दहावेळा फायनलच्या तिकिटावर बाजी मारली आहे. या चमकदार कामगिरीमुळं चेन्नईच्या संघावर दिग्गज खेळाडूंकडून तसेच चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाननेही सीएसकेला शुभेच्छा देण्यासाठी एक खास व्हिडीओ शेअर केला आहे.

इरफान पठान आयपीएलमध्ये हिंदी समालोचक म्हणून काम पाहत आहे. याचदरम्यात जे खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत, तसंच जे संघ अप्रतिम खेळ खेळत आहेत, त्यांचं पठान कॉमेंट्रीच्या माध्यमातून खूप कौतुक करत असतो. पहिल्या क्वालिफायरमध्ये चेन्नईने गुजरातचा पराभव केला. आता चेन्नई २८ मे ला आयपीएलच्या फायनलसाठी मैदानात उतरणार आहे. आयपीएलमध्ये पाचव्या जेतेपदावर शिक्कामोर्तब करण्याच्या इराद्याने चेन्नईचा संघ मैदानात उतरणार आहे.

job application from blinkit viral photo
पट्ठ्याने Blinkit चा वापर चक्क नोकरी मिळवण्यासाठी केला! सोशल मीडियावर ‘हा’ Photo होतोय व्हायरल…
IPL 2024 Kolkata Knight Riders vs Royal Challengers Banglore Match Updates in Marathi
IPL 2024: स्वप्नातही आरसीबीला हरवण्याचा विचार करणाऱ्या गंभीरनेच केलं विराटच्या संघाचं कौतुक, पाहा नेमकं काय म्हणाला
sourav ganguly
पंत तंदुरुस्त, पण सिद्ध करण्यासाठी वेळ हवा – गांगुली
Video Hardik Pandya Trolled Again For Praying At Gujarat Somnath Temple
Video: शेवटचा पर्याय ‘तोच’! हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सच्या सलग तीन पराभवानंतर पोहोचला गुजरातला अन्..

नक्की वाचा – IPL 2023 : ‘या’ खेळाडूमुळं CSK फायनलमध्ये पोहोचली, वीरेंद्र सेहवाग म्हणाला, “ज्या प्रकारचे गोलंदाज…”

इथे पाहा व्हिडीओ

मंगळवारी सामना संपल्यानंतर इरफानने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत चेन्नईला शुभेच्छा दिल्या. चेन्नईचा संघ दहाव्यांदा आयपीएलच्या फायनलमध्ये पोहोचल्याने पठानने सीएसकेचं कौतुक केलं. पठानने अनोख्या अंदाजात शुभेच्छा दिल्या. इरफानने प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता राजकुमारचा एक डायलॉग बोलत म्हटलं की, तोच जुना रंग, तोच अंदाज, तोच रुबाब आणि घमंड, असं कॅप्शन देत इरफानने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला.