आयपीएल म्हटलं की, प्रचंड दबावाखालील सामन्यांमध्ये प्रतिस्पर्धी खेळाडूंमध्ये खटके उडण्याचे प्रकरण काही नवे नाही. आयपीएलच्या धर्तीवर आजवर अनेक रोमांचक सामने आणि प्रसंग क्रिकेट रसिकांना अनुभवायला मिळाले आहेत. रविवारी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघातील सामन्यादरम्यान दोन प्रतिभावान कॅरेबियन खेळाडूंमध्ये बाचाबाची झाली आणि पंचांना हस्तक्षेप करावा लागला. वेस्ट इंडिज संघाचा सहकारी आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा सलामीवीर ख्रिस गेल याच्यासोबत सामन्याच्या तिसऱ्याच षटकात पोलार्डची शाब्दिक चकमक झाली. या प्रकरणानंतर पंचांनी पोलार्डला ताकीद दिली.  शाब्दिक चकमकीत आपली काहीच चूक नसल्याचा दावा करणाऱया पोलार्डने ताकीद देण्याऱया पंचांच्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी निषेध करण्यासाठी अनोखा मार्ग पत्करला. पोलार्डने चक्क तोंडावर टेप चिकटवून निषेध नोंदवला. मग, पोलार्डची ही कृती कॅमेरांनी टीपली आणि तोंडावर टेप चिकटवलेला पोलार्ड स्टेडियमवरील भव्य स्क्रिनवर झळकू लागला. पोलार्डच्या या कृतीनंतर मुंबई इंडियन्स संघाच्या प्रशिक्षक ताफ्यातील सहकाऱयांसह रिकी पाँटिंग आणि रॉबिन सिंग यांच्या चेहऱयावर स्मित हास्य पहायला मिळाले. फोटो गॅलरी पाहण्यासाठी वरील छायाचित्रावर क्लिक करा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व आयपीएल २०१५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kieron pollard mocks gag order hits back at umpires with sellotape
First published on: 20-04-2015 at 01:18 IST