Nitish Rana And Wife Saachi Marwah Romantic photo: चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्सने १० वर्षांनंतर पुन्हा एकदा आयपीएलच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाचा ८ विकेट्सने सहज पराभव करत मोठा विजय नोंदवला. हा मोठा सामना पाहण्यासाठी अनेक मोठे कलाकार तर आले होते. तर स्टेडियममध्ये खेळाडूंचे कुटुंबीयही उपस्थित होते. कोलकाताने हैदराबादला हरवून आयपीएलचे जेतेपद आपल्या नावे केले त्यानंतर कोलकात्याच्या खेळाडूंशिवाय त्यांचे कुटुंबीयही मैदानात उतरले. यादरम्यान, KKR स्टार आणि अनुभवी फलंदाज नितीश राणाची पत्नी देखील दिसली. नितीश राणा आणि त्याच्या पत्नीचा मैदानावरील एक रोमँटिक फोटो पाहायला मिळत आहे.

फायनल जिंकल्यानंतर केकेआरचा खेळाडू नितीश राणा आणि त्याची पत्नी सांची मारवाह मैदानात दिसले. दोघांनीही खूप रोमँटिक पोजमध्ये फोटो काढला, जो सांचीने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. नितीश राणाच्या खांद्यावर केकेआरचा झेंडा आहे आणि सांचीने त्याला मिठी मारत हा फोटो काढला आहे. इतकेच नव्हे तर तिने संघातील खेळाडूंसोबत फोटो, व्हीडिओही शेअर केले आहेत. केकेआर कॅम्पमध्ये सांची मारवाह सगळ्यांसोबत खेळीमेळीच्या वातावरणासह मजा मस्ती करताना दिसली. सांची आणि नितीश राणा यांचे रिंकूसोबतच नात खूप जवळचं आहे. सांचीला रिंकू दीदी म्हणतो, तर आयपीएल व्यतिरिक्तही हे तिघे एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसतात. जेतेपद पटकावल्यानंतर सांचीने रिंकूसोबतचा एक गोड फोटोही शेअर केला आहे.

lakhat ek amcha dada fame nitish chavan dance with Mahesh Jadhav and swapnil kinase
Video: प्रेमिका ने प्यार से…; ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील सूर्यादादाचा काजू, पुड्याबरोबर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
Swara bhaskar photo with Sajjad Nomani Troll
Swara Bhaskar: ‘व्होट जिहाद’चा उल्लेख केलेल्या सज्जाद नोमानींसह स्वरा भास्करचा फोटो पाहून नेटिझन्सनी उडवली खिल्ली
aayushman khurana
आयुष्मान खुरानाचा ताहिराबरोबर झाला होता ब्रेकअप; ‘हे’ होते कारण, अभिनेत्याने स्वत:चं केला खुलासा
Lakhat Ek Aamcha dada
Video: तेजूच्या लग्नाची सुपारी फुटली; डॅडी म्हणाले, “खरे नवरदेव…”, पाहा प्रोमो
Champions Trophy 2025 Updates ECB Came in Support of PCB
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ‘या’ देशाचा पाकिस्तानला पाठिंबा, BCCI शी पंगा घेणं पडू शकतं महागात
IPL Auction Who is Vaibhav Suryavanshi 13 Year Old Batter Becomes Youngest Player in IPL 2025 Mega Auction 2025 List
IPL 2025 Auction: कोण आहे वैभव सूर्यवंशी? आयपीएल लिलावात उतरणार फक्त १३ वर्षांचा भारतीय खेळाडू, ऑस्ट्रेलियाविरूद्ध झळकावलंय जलद शतक

हेही वाचा – KKR आणि शाहरूख खानने BCCI ला चिडवलं? ट्रॉफी जिंकल्यानंतर ‘ही’ पोज देत केलं सेलिब्रेशन, VIDEO व्हायरल

नितीश राणाच्या पत्नीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये रिंकू सिंग ब्लॉग शूट करताना दिसत आहे, ज्याचा एक मजेशीर व्हीडिओही तिने शेअर केला आहे. या व्हीडिओमध्ये केकेआरचे काही खेळाडू सांची, नितीशही होते. संघातील खेळाडूंसोबचा सेल्फीही तिने पोस्ट केला. सांचीने केकेआरला सपोर्ट करण्यासाठी आलेल्या श्रेयस अय्यरची बहीण आणि श्रेयसची गर्लफ्रेंड असल्याची अफवा असलेली त्रिशा कुलकर्णी यांच्यासोबतचा एक फोटोही शेअर केला. पण या फोटोदरम्यान सांची आणि नितीशचा रोमँटिक फोटो खूपच व्हायरल होत आहे.

केकेआरने आयपीएल जिंकल्यानंतर सांची मारवाहने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिने कोलकाताचा मेंटर गौतम गंभीरसोबतचा एक फोटोही शेअर केला आहे. तर इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये गौतम गंभीरसोबतचा फोटो शेअर करत त्याचं कौतुक केलं. नितीश राणाची पत्नी सांची मारवाह ही व्यवसायाने इंटिरियर डिझायनर आहे. तर तिचं बॉलिवूडशीही खास नातं आहे. सांची ही बॉलीवूडचा दिग्गज अभिनेता गोविंदाची भाची आहे.