केकेआर विरूध्द लखनऊच्या सामन्यात सीमारेषेजवळ बॉल ब़ॉयने एक शानदार झेल टिपत सर्वांचं लक्ष वेधलं. त्याचा हा झेल पाहून उत्कृष्ट क्षेत्ररक्षक राहिलेल्या जॉन्टी ऱ्होड्सलाही चकित केले. ऱ्होड्सने या सामन्यानंतर त्या मुलाची मुलाखत घेतली, ज्याचा व्हीडिओ आता व्हायरल होत आहे. केकेआरने लखनऊवर ९८ धावांनी मोठा विजय मिळवला आणि या विजयासह संघ गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.

या सामन्यातील बॉय बॉलच्या झेलने सीमारेषेबाहेर झेल टिपला खरा पण त्याने ज्याप्रकारे धावत येऊन हा झेल घेतला ते पाहता सर्वच जण चकित झाले होते. लखनऊच्या डावात मार्कस स्टॉइनिसने एक जबरदस्त षटकार लगावला. पण या षटकाराची सर्वात खास गोष्ट म्हणजे बॉल बॉयने ज्या पद्धतीने कॅच पकडला ते पाहून जॉन्टी ऱ्होड्सही खूप खुश झाला. ऱ्होड्सने मुलासाठी टाळ्याही वाजवल्या, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सामना संपल्यानंतर जॉन्टी ऱ्होड्स स्वत: त्या मुलाला भेटायला आला आणि त्याच्याशी खूप वेळ बोलतानाही दिसला. यादरम्यान ऱ्होड्सने त्याला फिल्डींग करण्याच्या काही टिप्सही दिल्या. खरे तर त्या बॉल बॉयचे नाव अथर्व गुप्ता आहे. जॉन्टीला भेटल्याचा अथर्वलाही खूप आनंद झाला. त्याचा व्हिडिओ आयपीएलच्या अधिकृत अकाऊंटवरही शेअर करण्यात आला आहे.

अथर्वनेही जॉन्टी ऱ्होड्सचा चाहता असल्याचे सांगितले, “मी जॉन्टी ऱ्होड्सच्या क्षेत्ररक्षणाचा खूप मोठा चाहता आहे. त्याला भेटून मला खूप छान वाटतं. मी त्याला यापूर्वीही भेटलो आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयपीएलच्या ५४ व्या सामन्यात, वेस्ट इंडिजचा अनुभवी सलामीवीर सुनील नरेनच्या ८१ धावांच्या खेळीच्या जोरावर केकेआरने २३४ धावांचा डोंगर उभारला. ६ बाद २३४ धावा ही एका क्रिकेट स्टेडियमवरील सर्वोच्च धावसंख्या ठरली. पण लक्ष्याचा पाठलाग करण्यात अपयशी ठरलेल्या लखनऊचा केकेआरने ९८ धावांनी मोठा पराभव केला.