आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील सर्वच सामने अटीतटीचे होत आहेत. आज सायंकाळी ७.३० वाजता पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमधील स्टेडियमवर आज लखनऊ आणि कोलकाता या दोन संघांमध्ये लढत होणार आहे. दरम्यान आजच्या या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सचे खेळाडू अनोख्या अवतारात दिसणार आहेत. मदर्स डेच्या निमित्ताने लखनऊ टीमच्या खेळाडूंच्या जर्सीवर त्यांच्या आईचे नाव असणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> रोहित शर्माचा नाद करायचा नाय! गुजरातविरोधात खेळताना केली ‘ही’ अनोखी कामगिरी, मुंबईसाठी…

८ मे रोजी जगभरात मदर्स डे साजरा केला जातो. याच निमित्ताने लखनऊ सुपर जायंट्सचे खेळाडूदेखील हा दिवस साजरा करणार आहेत. आज सायंकाळी लखनऊ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात लढत होणार आहे. या लढतीत लखनऊ खेळाडूंच्या जर्सीवर त्यांच्या आईचे नाव असणार आहे. लखनऊ सुपर जायंट्सने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर तसे जाहीर केले आहे.

हेही वाचा >>>  बंगळुरु-चेन्नई सामन्यात प्रेमाचा बहर, तरुणीने गुडघ्यावर बसून केलं प्रपोज, तरुणाने काय केलं? पाहा व्हिडीओ

लखनऊ फ्रेंचायझीने त्यांच्या अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये लखनऊच्या खेळाडूंची जर्सी दाखवण्यात आली आहे. मात्र या जर्सीवर खेळाडूंच्या नावाऐवजी त्यांच्या आईचे नाव आहे. तसेच हा व्हिडीओ पोस्ट करताना ‘आई हे तुझ्यासाठी’ असेदेखील लखनऊ संघाने म्हटले आहे.

हेही वाचा >>> अफलातून जोस बटलर! हवेत झेप घेत एका हाताने टिपला झेल, धवनला केलं बाद

लखनऊ सुपर जायंट्सचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन : केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक, दीपक हुडा, मार्कस स्टोइनिस, कृणाल पांड्या, कृष्णप्पा गौथम, आयुष बदोनी, जेसन होल्डर, दुष्मंथा छमिरा, मोहसिन खान, रवी बिश्नोई

हेही वाचा >>>  Video : पहिल्याच षटकात मुकेश चौधरीने घेतला पंगा, विराट कोहलीला चेंडू लागताच…

कोलकाता नाईट रायडर्स संघाचा संभाव्य प्लेइंग इलेव्हन : आरॉन फिंच, सुनील नरेन, श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, इंद्रजित, अनुकुल रॉय, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, उमेश यादव, टीम साऊदी, शिवम मावी

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lucknow super giants celebrating mothers day print mothers name on lsg player jersey prd
First published on: 07-05-2022 at 18:13 IST