Most Explosive Inning In IPl History : इंडियन प्रीमियर लीगने टी-२० क्रिकेटचा रोमांच अधिकच वाढवला आहे. २००८ मध्ये आयपीएलच्या पहिल्या पर्वाला सुरुवात झाली अन् बघता बघता ही टूर्नामेंट वर्षानुवर्षे लोकप्रिय होत गेली. देश-विदेशातील धाकड खेळाडूंनी या आयपीएलमध्ये धडाकेबाज खेळी केली आहे. टूर्नामेंटच्या स्फोटक खेळीबाबत बोलायचं झालं तर, ख्रिस गेलची १७५ धावांची वादळी खेळी सर्वांनाच आठवत असेल. या लिस्टमध्ये ख्रिस गेल अव्वल स्थानी आहे. पण त्यानंतर कोणत्या फलंदाजांनी बाजी मारली आहे, याबाबत जाणून घेऊयात.

इंडियन प्रीमियर लीगच्या स्फोटक खेळीमध्ये चौकार-षटकारांचा पाऊस पडला आहे. टूर्नामेंटच्या इतिहासातील सर्वात आक्रमक खेळी ख्रिस गेलच्या नावावर नोंदवण्यात आली आहे. २०१३ मध्ये ख्रिस गेलने वादळी दीड शतकी खेळी करून अनेक विक्रमांना गवसणी घातली. एकाच इनिंगमध्ये सर्वात जास्त चौकार आणि षटकार ठोकण्याचा विक्रम आजतागायत कोणत्याच खेळाडूने मोडला नाही.

Yashasvi Jaiswal 13 run on 1st legal delivery in T20I
IND vs ZIM: एका चेंडूत १३ धावा! यशस्वी जैस्वालचा दुर्मिळ विक्रम, T20I च्या इतिहासात ‘ही’ कामगिरी करणारा पहिला फलंदाज
Sikandar Raza completes 2000 runs in t20 cricket
IND vs ZIM 4th T20I : सिकंदर रझाने रचला इतिहास, झिम्बाब्वेसाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू
Chris Gayle Stormy Half Century
WCL 2024 : ४४व्या वर्षी ख्रिस गेलचा झंझावात; चौकार-षटकारांनी पुन्हा जिंकली चाहत्यांची मनं, VIDEO व्हायरल
India vs Zimbabwe 2nd T20I Updates Cricket Score in Marathi
IND vs ZIM 2nd T20I : अभिषेक शर्माच्या शतकाच्या जोरावर भारताचा झिम्बाब्वेवर दणदणीत विजय, १०० धावांनी उडवला धुव्वा
Chris Gayle statement on Virat's performance in 2024 World Cup
IND vs SA Final: युनिव्हर्स बॉसचे विराट कोहलीच्या फॉर्मबद्दल मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘त्याला तुम्ही कमी…’
India Women Cricket Team Scored Highest Ever Team Total In Womens Test
INDW vs SAW: भारताच्या लेकींचा विश्वविक्रम, ९० वर्षांच्या महिला कसोटी क्रिकेटच्या इतिहासात ही कामगिरी करणारा भारत पहिलाच संघ
Rohit sharma broke Fastesf Fifty Record by Captain in T20 World Cup history
IND v AUS: कॅप्टन रोहित शर्माचे टी-२० वर्ल्डकपच्या इतिहासातील वेगवान अर्धशतक, १७ वर्षे जुना विक्रम मोडला
Rohit Sharma breaks Chris Gayle's record
IND vs BAN : रोहित शर्माने रचला इतिहास! ख्रिस गेलचा ‘हा’ षटकारांचा विक्रम मोडत ठरला नवा ‘सिक्सर किंग’

नक्की वाचा – IPL इतिहासातील ‘नर्व्हस ९९’; शतकाच्या उंबरठ्यावर असताना ‘या’ फलंदाजांना दाखवला पॅव्हेलियनचा रस्ता

आयपीएलमधील सर्वात आक्रमक खेळी

ख्रिस गेलने २०१३ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळताना पुणे वॉरियर्स विरोधात झालेल्या सामन्यात नाबाद १७५ धावांची वादळी खेळी केली होती. या इनिंगमध्ये गेलने १३ चौकार आणि १७ षटकार ठोकले होते. टूर्नामेंटच्या इतिहासात एकाच इनिंगमध्ये सर्वात जास्त चौकार ठोकण्याची नोंद या सामन्यात करण्यात आली होती. या लिस्टमध्ये दुसऱ्या नंबरवर ब्रेंडन मॅक्यूलमच्या नावाची नोंद करण्यात आलीय.

कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना मॅक्यूलमने आयपीएलच्या पहिल्या सीजनमध्ये नाबाद १५८ धावांची दीड शतकी खेळी केली होती. या इनिंगमध्ये त्याने १० चौकार आणि १३ षटकार ठोकले होते. तसंच या लिस्टच्या तिसऱ्या क्रमांकावरही ख्रिस गेलच्या नावाची नोंद झालीय. डेक्कन चार्जर्स विरोधात झालेल्या सामन्यात ख्रिस गेलने नाबाद १२८ धावांची शतकी खेळी केली होती. या इनिंगमध्ये गेलने ७ चौकार आणि १३ षटकार ठोकले होते.