तब्बल ४३७ दिवसांनी भारतीय संघाचा माजी यष्टीरक्षक आणि कर्णधार महेंद्रसिंह धोनी मैदानात उतरला. आयपीएलच्या तेराव्या हंगामाला शनिवारपासून युएईत सुरुवात झाली. गतविजेत्या मुंबई इंडियन्सवर चेन्नई सुपरकिंग्जने ५ गडी राखून मात केली. काल संपूर्ण सामन्यात सोशल मीडियावर चर्चा होती ती धोनीची. वर्षभरानंतर धोनी मैदानावर उतरत असल्यामुळे चाहते उत्साहात होते. भारतीय संघाचे माजी खेळाडू आणि आयपीएलमध्ये समालोचन करत असलेल्या सुनील गावसकर यांनी धोनीचं कौतुक करताना त्याने लोकप्रियतेच्या बाबतीत सचिन आणि कोहलीला मागे टाकलंय असं म्हटलं आहे.

अवश्य वाचा – MI vs CSK : धोनी कधी येणार?? सोशल मीडियावर रंगली चर्चा

“ज्यावेळी धोनी मैदानावर येतो त्यावेळी एक वेगळी उर्जा निर्माण होते. प्रेक्षक मैदानात असो की घरात टिव्हीसमोर…सर्वजण धोनीची वाट पाहत असतात. मला माहिती आहे सचिन आणि विराट कोहलीचे चाहते माझ्या मताशी समहत नसतील. सचिनचे चाहते तुम्हाला मुंबई आणि कोलकात्यात सर्वाधिक मिळतील. दिल्ली आणि बंगळुरुत विराटची क्रेझ आहे. परंतू धोनीवर संपूर्ण देशातले चाहते प्रेम करतात. लोकप्रियतेच्या बाबतीत धोनीने सचिन आणि विराटला मागे टाकलंय.” सामना सुरु होण्याआधी गावस्कर बोलत होते.

आयपीएलच्या पहिल्या सामन्यात मुंबईने विजयासाठी दिलेल्या १६३ धावांचा पाठलाग करताना चेन्नईकडून फलंदाजी करण्यासाठी धोनी मैदानात येईल अशी अनेकांना आशा होती. परंतू धोनीने इथेही आपलं धक्कातंत्र आजमावत जाडेजा आणि सॅम करनला आपल्या पुढे संधी देत नंतर येणं पसंत केलं. करन माघारी परतल्यानंतर धोनी मैदानात खेळण्यासाठी आला…परंतू त्याने एकही धाव न घेता विजयी फटका मारण्याची संधी डु प्लेसिसला दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अवश्य वाचा – Video : डु-प्लेसिस फ्लाईंग मोडमध्ये, सीमारेषेवर पकडले दोन भन्नाट कॅच