आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ५६ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने दमदार गोलंदाजी केली. गोलंदाजांच्या भेदक माऱ्याच्या जोरावर मुंबईने कोलकाता नाईट रायडर्स संघाला १६५ धावांवर रोखलं. मुंबईच्या जसप्रित बुमराहने तर नेत्रदीपक कामगिरी करत पाच फलंदाजांना बाद केलं. त्याच्या या गोलंदाजीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

हेही वाचा >>> मुंबई इंडियन्सला मोठा धक्का, दिग्गज खेळाडू सूर्यकुमार यादव आयपीएलमधून बाहेर

कोलकाता नाईट रायडर्स संघाने सुरुवातीला फलंदाजीसाठी येत धमाकेदार सुरुवात केली. ६० धावा झालेल्या असताना कोलकाताचा पहिला फलंदाज बाद झाला. त्यानंतर १३६ धावसंख्येपर्यंत कोलकाता संघाचे फलंदाज चांगली कामगिरी करताना दिसले. त्यानंतर मात्र मुंबईच्या जसप्रित बुमराहने आपली जादू दाखवायला सुरुवात केली. त्याने या सामन्यात कोलकाताच्या पाच फलंदाजांना बाद केलं. सतराव्या षटकात तर त्याने तीन फलंदाजांना तंबुत पाठवलं.

हेही वाचा >>> दोन वेळा विजय, 2 वेळा फायनल; जाणून घ्या हिरव्या रंगाची जर्सी आणि RCBचं खास कनेक्शन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सतराव्या षटकात एकही धाव न देता बुमहराहने शेल्डन जॅक्सन (५), पॅट कमिन्स (०), आणि सुनिल नरेन (०) या तीन फलंदाजांना बाद केलं. या तीन विकेट्समुळे कोलकाता संघ चांगलाच अडचणीत आला. यापूर्वी त्याने चांगल्या फॉर्ममध्ये असणाऱ्या नितीश राणालादेखील झेलबाद केले. तसेच त्याने आंद्र रसेल या घातक फलंदाजाला तंबूत पाठवण्यात यश मिळवलं. त्याच्या याच गोलंदाजीमुळे कोलकाता संघ खिळखिळा झाला. कोलकाताला वीस षटकांमध्ये १६५ धावांपर्यंत मजल मारता आली.