आयपीएलच्या पंधराव्या हंगामात मुंबई इंडियन्सने खराब कामगिरी केली आहे. सध्या या संघाच्या प्लेऑफपर्यंत पोहोचण्याच्या आशा मावळल्या आहेत. असे असताना आता मुंबई इंडियन्सला मोठा झटका बसला आहे. मुंबई इंडियन्सचा दिग्गज फलंदाज सूर्यकुमार यादव हाताला दुखापत झाल्यामुळे आयपीएलमधून बाहेर पाडला आहे. तशी माहिती मुंबई इंडियन्सने अधिकृतरित्या दिली आहे.

हेही वाचा >>> दोन वेळा विजय, 2 वेळा फायनल; जाणून घ्या हिरव्या रंगाची जर्सी आणि RCBचं खास कनेक्शन

मुंबई इंडियन्स संघाचा फलंदाज सूर्यकुमार यादवला आयपीएलच्या सुरुवातीला दुखापत झाली होती. तो सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये सहभागी होऊ शकला नव्हता. दुखापतीतून बरा झाल्यानंतर तो पुन्हा एकदा संघात सहभागी झाला होता. मात्र गुजरात टायटन्स संघाविरोधात खेळताना त्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली. परिणामी डॉक्टरांनी त्याला आराम करण्याचा सल्ला दिला आहे. याच कारणामुळे तो आयपीएलच्या उर्विरित सामन्यांमधून बाहेर पडला आहे. सूर्यकुमार यादवने या हंगामात एकूण आठ सामने खेळले. या सामन्यांत त्याने ४३.२९ च्या सरासरीने ३०३ धावा केल्या.

हेही वाचा >>> ग्रेट कॅप्टन कूल! धोनीने ८ चेंडूंत २१ धावा करत रचला नवा विक्रम, विराट कोहलीच्या पंक्तीत मिळवलं स्थान

दरम्यान, आज कोलकाताशी दोन हात करण्याआधीच मुंबईला हा मोठा झटका बसला आहे. या संघाने सुरुवीचे सलग आठ सामने गमावले. तर आतापर्यंत फक्त दोन सामन्यांमध्ये विजय मिळवलेला आहे. यानंतरचे सर्व सामने जिंकले तरी मुंबई संघाला प्लेऑफपर्यंत पोहोचता येणार नाही.