मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएलच्या इतिहासात सर्वात यशस्वी संघ म्हणून ओळखला जातो. रोहित शर्माच्या मुंबई संघाने आतापर्यंत ४ विजेतेपद पटकावली आहे. आयपीएलच्या तेराव्या हंगामाचा पहिला सामना मुंबई इंडियन्स चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध खेळणार आहे. तेरावा हंगाम जसजसा जवळ येत चालला आहे तसे सर्व संघ सोशल मीडियावरही चांगलेच सक्रीय झालेले आहेत. मुंबई इंडियन्सने यातही बाजी मारत इन्स्टाग्रामवर 5 million फॉलोअर्सचा टप्पा गाठला आहे. अशी कामगिरी करणारा मुंबई इंडियन्स पहिला संघ ठरला आहे.

अवश्य वाचा – IPL 2020 : …तर पोलार्डला पाचव्या क्रमांकाच्या खाली फलंदाजीला पाठवू नका !

या यादीत चेन्नई 4.8 million फॉलोअर्ससह दुसऱ्या स्थानावर आहे. गुणतालिकेत नेहमी अखेरच्या स्थानावर राहणारा RCB चा संघ इन्स्टाग्रामवर 4 million फॉलोअर्ससह तिसऱ्या स्थानावर आहे. इन्स्टाग्रामवर फॉलोअर्सच्या निकषांमध्ये इतर संघ या तिन्ही संघाच्या शर्यतीत जवळपासही नाहीयेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सचा संघ यंदाच्या हंगामाचं विजेतेपद पटकावण्यास उत्सुक आहे. सध्या सर्व संघ युएईत सराव करत आहेत. २०१९ साली मुंबई इंडियन्सने अंतिम सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जवर एका धावेने मात करत विजेतेपद पटकावलं होतं.