लोकप्रिय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ दिल्ली कॅपिटल्सकडून यंदाचे आयपीएल खेळत आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या टीमचा विमानतळावरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, या व्हिडीओत त्याच्याबरोबर एक तरुणी दिसत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ही तरुणी कोण? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

‘फिल्मीज्ञान’ या पापाराझी अकाउंटवरून एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ विमानतळावरून बाहेर पडतानाचा आहे. यात दिल्ली कॅपिटल्सची संपूर्ण टीम आहे, त्याचबरोबर पृथ्वी शॉदेखील आहे. यावेळी पृथ्वीबरोबर असलेल्या तरुणीने लक्ष वेधून घेतलं आहे. डेनिम शर्ट व जीन्स घातलेली एक तरुणी पृथ्वीबरोबर जाताना दिसत आहे, ही तरुण कोण असं चाहते विचारत आहेत.

काही सोशल मीडिया युजर्सनी ही निधी तापडिया असल्याचं म्हटलं आहे. व्हिडीओत दिसणारी तरुणी निधी तापडिया ही यापूर्वी बऱ्याचदा पृथ्वीबरोबर दिसली आहे. निधी सीआयडी मालिकेत झळकली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निधी तापडियाचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. पृथ्वी शॉने त्रिशतक झळकावल्यावर तिने त्याच्यासाठी अनेक पोस्ट्सही केल्या होत्या. त्यानंतर बऱ्याचदा ते दोघे एकत्र दिसतात.