IPL 2022 GT vs RR Final : आयपीएलच्या १५ व्या हंगामातील अंतिम लढत आज राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या लढतीला रात्री ८ वाजता सुरुवात होणार आहे. दरम्यान या सामन्याचा थरार अनुभवण्यासाठी गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील उपस्थित राहणार असल्याचं सांगण्यात येतंय. याच कारणामुळे अहमदाबादेत सहा हजारपेक्षा जास्त पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

हेही वाचा >>> IPL 2022 Final: अंतिम सामन्यासाठी गृहमंत्री अमित शाह लावणार हजेरी, सुरक्षेसाठी तब्बल सहा हजार पोलीस तैनात

Arvind kejriwal
अरविंद केजरीवाल यांची तुरुंगात इन्सुलिन देण्याची मागणी, न्यायालयात याचिका दाखल
rajeev chandrasekhar vs shashi tharoor
तिरुवनंतपूरममध्ये राजीव चंद्रशेखर यांच्या उमेदवारीनं शशी थरूर यांच्यासमोर आव्हान; मतदारसंघात कोणाचा होणार विजय?
kalyan woman gudi making business marathi news,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी कल्याणची गुढी
Mayawati Chandrashekhar Aazad
मायावतींची नवी खेळी; चंद्रशेखर आझाद यांना टक्कर देण्यासाठी पुतण्या रिंगणात

आज राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणाऱ्या अंतिम सामन्याला बॉलिवूडमधील दिग्गज कलाकार हजेरी लावणार आहेत. विशेष म्हणजे हा सामना पाहण्यासाठी गृहमंत्री अमित शाहादेखील उपस्थित राहणार आहेत. बॉलिवुडसह राजकारणातील मोठे चेहरे सामना पाहण्यासाठी येणार असल्यामुळे अहमदाबादमधील सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली आहे. येथ एकूण सहा हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून येथे वेगवेगळ्या दलाचे जवानदेखील तैनात करण्यात आलेले आहेत.

हेही वाचा >>> महिला ट्वेन्टी-२० चॅलेंज क्रिकेट : सुपरनोव्हाजला विजेतेपद; अंतिम सामन्यात व्हेलोसिटीवर मात; डॉटिनचे अर्धशतक

नरेंद्र मोदी सामना पाहायला येणार?

दरम्यान, अमित शाह यांच्यासोबतच नरेंद्र मोदीदेखील आजचा सामना पाहण्यासाठी येणार असल्याची चर्चा आहे. तसा दावा काही वृत्तसंकेतस्थळांनी केला आहे. मात्र या वृत्ताला अद्याप पुष्टी मिळालेली नाही. मात्र मोदी येणार किंवा नाही याबाबत अजूनही संभ्रम आहे. मात्र खबरदारी म्हणून अहमदबाद शहर तसेच नरेंद्र मोदी स्टेडियम परिसरात सर्व काळजी घेण्यात आली आहे. या भागातील सुरक्षा व्यवस्था आणखी वाढवण्यात आली आहे.

हेही वाचा >>> आयपीएल विजेत्या संघावर पडणार पैशांचा पाऊस, जाणून घ्या किती आहे बक्षिसाची रक्कम

सामना सुरु होण्यापूर्वी समारोप सोहळा

यावेळी बीसीसीआय तसेच आयपीएलने अंतिम सामन्याआधी समारोप सोहळा आयोजित करण्याचे ठरवले आहे. या सोहळ्यामुळे सामना अर्धा तास उशिराने सुरु होणार आहे. आजचा सामना सायंकळी ७.३० ऐवजी आठ वाजता सुरु होणार आहे. समारोप सोहळ्याला दिग्गज अभिनेता रणवीर सिंह आणि प्रसिद्ध संगीतकार ए.आर रहमान मनोरंजनपर कार्यक्रम सादर करतील.