Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore: आयपीएल २०२३ चा ५४ वा सामना मुंबई इंडियन्स आणि आरसीबी यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. जेव्हा-जेव्हा या दोन्ही संघांमध्ये सामना होतो, तेव्हा चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता असते. दोन्ही संघांचा स्वतःचा चाहता वर्ग आहे. प्लेऑफच्या दृष्टीने हा सामना आरसीबी आणि मुंबईसाठी खूप महत्त्वाचा आहे. गेल्या ८ वर्षांपासून वानखेडे स्टेडियमवर आरसीबीला मुंबईविरुद्धचा एक डाग पुसता आलेला नाही.

आरसीबीला ८ वर्षापासून विजयाची प्रतिक्षा –

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आरसीबी आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आतापर्यंत ९ सामने झाले आहेत. त्यापैकी ६ मुंबई संघाने जिंकले आहेत. त्याच वेळी, आरसीबीने केवळ ३ सामने जिंकले आहेत. २०१५ मध्ये वानखेडेवर आरसीबीने मुंबईचा ३९ धावांनी पराभव केला होता. त्यानंतर गेल्या ८ वर्षांपासून आरसीबी संघाला वानखेडे स्टेडियमवर मुंबईला हरवता आलेले नाही.

MS Dhoni's surprise visit to RCB dressing room
VIDEO: RCB vs CSK सामन्यापूर्वी एमएस धोनी गेला आरसीबीच्या ड्रेसिंग रूममध्ये, पाहा नेमकं करतोय तरी काय
Shubamn Gill Touches Feet of Abhishek sharma Mother Video Viral
IPL 2024: शुबमन गिलने स्टेडियममध्येच अभिषेक शर्माच्या आईला खाली वाकून केला नमस्कार, Video व्हायरल
MS Dhoni announcement on way
CSK vs RR : एमएस धोनीचा चेन्नईत शेवटचा IPL सामना? CSK च्या ‘त्या’ पोस्टने चाहत्यांची वाढली धाकधूक
Virat Kohli and Kagiso Rabada Video Viral
PBKS vs RCB : कगिसो रबाडाच्या पॉडकास्टमध्ये विराट कोहलीने मारली अचानक एन्ट्री, VIDEO होतोय व्हायरल
Matthew Hayden's daughter and MI fans chanting "Mumbai Cha Raja, Rohit Sharma"
IPL 2024: मॅथ्यू हेडनची लेकही हिटमॅनची फॅन, चाहत्यांबरोबर ‘मुंबईचा राजा रोहित शर्मा’ म्हणत केलं चीअर; VIDEO व्हायरल
Yuzvendra Chahal Becomes First Bowler To Complete 200 Wickets in IPL
IPL 2024: युझवेंद्र चहलने रचला इतिहास, आयपीएलच्या इतिहासात ही कामगिरी करणारा पहिला गोलंदाज
Mumbai Indians Kieron Pollard and Tim David Fined 20 Percent Match Fees for Breaching IPL Code of Conduct
IPL 2024: पोलार्ड आणि टीम डेव्हिडवर आयपीएलकडून कारवाई, मुंबई-पंजाबमधील लाईव्ह सामन्यातील ‘ही’ चूक पडली महागात
mohammad nabi run out kagiso rabada ishan kishan wicketkeeping win mumbai indians match vs pbks ipl 2024 aggressive celebration rohit sharma haridik pandya and all mi team
VIDEO : नबी-किशनच्या ‘हुशारी’समोर आशुतोष-शशांकची मेहनत वाया; शेवटच्या ओव्हरमध्ये बाजी पालटली आणि जे घडलं…

दोन्ही संघांचे हेड टू हेड रेकॉर्ड –

आयपीएलमध्ये आतापर्यंत आरसीबी आणि मुंबई इंडियन्स यांच्यात ३१ सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी मुंबईने १७ आणि आरसीबी संघाने १४ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. पण गेल्या काही काळापासून आरसीबीचा वर्चस्व राहिले आहे. बंगळुरु-मुंबई यांच्यात झालेल्या शेवटच्या ६ सामन्यांबद्दल बोलायचे झाले तर, बंगळुरुने ५ मध्ये विजय मिळवला आहे. त्याचबरोबर मुंबईला केवळ एकच सामना जिंकता आला आहे. दोन्ही संघांच्या विजेतेपदांबद्दल बोलायचे झाले, तर मुंबईने पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. त्याचवेळी आरसीबी संघाला एकही विजेतेपद मिळवता आलेले नाही.

हेही वाचा – IPL 2023: पंजाबविरुद्धच्या विजयानंतर केकेआरला मोठा फटका! बीसीसीआयने ‘या’ कारणासाठी नितीश राणावर केली कारवाई

विजेत्या संघाचा प्लेऑफचा मार्ग खुला होणार –

आयपीएल २०२३ पॉइंट टेबलमध्ये आरसीबीचा संघ सहाव्या क्रमांकावर आहे. त्याचवेळी मुंबई इंडियन्स ८ व्या क्रमांकावर आहे. दोन्ही संघांचे १०-१० गुण आहेत. आजच्या सामन्यात जो संघ विजयी होईल. त्याच्यासाठी प्लेऑफचा रस्ता सोपा असेल. त्याचबरोबर पराभूत होणारा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडू शकतो.