KKR captain Nitish Rana has been fined Rs 12 lakh: आयपीएल २०२३ मधील ५३ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज संघात खेळला गेला. या सामन्यातने कोलकाता पंजाबवर ५ विकेट्सने विजय मिळवला. त्याचबरोबर प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जिवंत ठेवल्या. मात्र या शानदार विजयानंतर लगेचच केकेआरचा कर्णधार नितीश राणाला मोठा धक्का बसला. कारण नितीश राणा हा स्लो ओव्हर रेटसाठी दोषी आढळला असून त्यांच्यावर १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

आयपीएलने जारी केलेल्या प्रेस रिलीजमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. या प्रेस रिलीजमध्ये म्हटले आहे की, “कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार नितीश राणाला दंड ठोठावण्यात आला आहे. नितीश राणा आणि त्यांची टीम स्लो ओव्हर रेटसाठी दोषी आढळली आहे. या मोसमात केकेआर प्रथमच स्लो ओव्हर रेटसाठी दोषी आढळल्याने त्यांच्यावर १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.”

MS Dhoni Becomes The First player to Win 150 Games in IPL
IPL 2024: एम एस धोनीच्या नावे मोठा विक्रम, आयपीएलच्या इतिहासात ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू
ipl 2024 sakshi dhoni urges to chennai super kings to finish match fast against sun risers hydrabad and said baby is on the way
PHOTO : … म्हणून साक्षी धोनीने चेन्नईला केली होती मॅच लवकर संपवण्याची विनंती, म्हणाली, “बेबी आनेवाला है…”
Virat Kohli Irritates Shubman Gill in GT vs RCB Match Watch Video
GT vs RCB सामन्यात विराटने शुबमनला दिला त्रास, आऊट झाल्यावर चिडवलं तर कधी मारला धक्का; VIDEO व्हायरल
Chennai Super Kings vs Sunrisers Hyderabad Match Highlights in Marathi
CSK vs SRH : गायकवाड, देशपांडे चमकले; चेन्नईची हैदराबादवर सहज मात

या मोसमात नितीश राणा आणि केकेआर पुन्हा स्लो ओव्हर रेटसाठी दोषी आढळले, तर त्यांच्या अडचणी आणखी वाढू शकतात. दुसर्‍यांदा दोषी आढळल्यास, संपूर्ण सामन्याची फी कापण्याव्यतिरिक्त, एका सामन्याची बंदी देखील घातली जाऊ शकते.

हेही वाचा – Jofra Archer: मुंबई इंडियन्सला मोठा धक्का! जोफ्रा आर्चर आयपीएल २०२३ मधून बाहेर; ‘या’ अष्टपैलू खेळाडूला मिळाली संधी

नितीश राणाची कामगिरी उत्कृष्ट होती –

पंजाब किंग्जविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात केकेआरचा कर्णधार नितीश राणाने कर्णधारपदाला साजेशी खेळी खेळली. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना राणाने ३८ चेंडूत ५१ धावा केल्या. राणाच्या या खेळीच्या जोरावर केकेआरने पंजाब किंग्जने दिलेले १८० धावांचे अवघड लक्ष्य गाठले. या विजयासह केकेआरने प्लेऑफ खेळण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत.

या सामन्यात पंजाब किंग्जने प्रथम फलंदाजी करताना सात गड्यांच्या मोबदल्यात १७९ धावा केल्या. शिखर धवनने सर्वाधिक ५७धावांची खेळी खेळली. प्रत्युत्तरात कोलकाता नाईट रायडर्सने पाच गडी गमावून १८२ धावा केल्या आणि अखेरच्या चेंडूवर सामना जिंकला. कोलकाताकडून कर्णधार नितीश राणाने सर्वाधिक ५१ धावा केल्या. या मोसमात ११ सामने खेळल्यानंतर केकेआरचे १० गुण झाले आहेत आणि ते गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर आहेत. मात्र, प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी केकेआरला शेवटचे तीनही सामने जिंकावे लागतील.