RCB Announces Replacement For Lungi Ngidi: आयपीएल २०२५ आता शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे. प्लेऑफ गाठण्यासाठी संघांमध्ये चुरस पाहायला मिळत आहे, दरम्यान ३ संघ प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत. तर एका स्थानासाठी ३ संघांमध्ये लढत सुरू आहे. दरम्यान क्वालिफाय झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने नव्या खेळाडूला ताफ्यात सामील केलं आहे.

आयपीएल २०२५ एका आठवड्याच्या स्थगितीनंतर पुन्हा सुरू झालं आहे. त्यामुळे अनेक खेळाडू राष्ट्रीय कर्तव्यासाठी प्लेऑफचे सामने खेळताना दिसणार नाहीत. यासाठी आरसीबीने प्लेऑफकरता लुंगी एनगिडीच्या जागी नव्या खेळाडूची घोषणा केली आहे. लुंगी एनगिडीची दक्षिण आफ्रिका वि. ऑस्ट्रेलिया यांच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी संघात निवड झाली आहे.

आरसीबीने अशा एका खेळाडूला संघात सामील केलं आहे, ज्याची गणना जगातील सर्वाच उंच खेळाडूंमध्ये केली जाते. या खेळाडूचं नाव आहे ब्लेसिंग मुझरबानी. २८ वर्षीय खेळाडू हा झिम्बाब्वेचा वेगवान गोलंदाज आहे आणि प्लेऑफकरता आरसीबीच्या ताफ्यात सामील होणार आहे.

ब्लेसिंग मुजरबानीची उंची ६ फूट ८ इंच असल्याचे सांगितले जाते. आता यानुसार, तो मार्को यान्सनइतका उंच आहे. त्याची उंचीही ६ फूट ८ इंच आहे. अशाप्रकारे, हे दोघेही सध्याच्या क्रिकेटमधील सर्वात उंच खेळाडू आहेत. अधिकृत माहिती देताना आरसीबीने म्हटलं आहे की, “२८ वर्षीय झिम्बाब्वेचा वेगवान गोलंदाज ब्लेसिंग मुझाराबानी याला लुंगी एनगिडी याच्या जागी तात्पुरता बदली खेळाडू म्हणून संघात स्थान देण्यात आले आहे. एनगिडी २६ मे रोजी दक्षिण आफ्रिकेला परतेल. लुंगी लीग सामन्यांसाठी उपलब्ध असेल.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

६ फूट ८ इंच उंचीच्या मुझरबानीने एकूण ११८ टी-२० सामने खेळले आहेत ज्यात ७० आंतरराष्ट्रीय टी-२० सामने आहेत. त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने ७० सामन्यांमध्ये ७८ विकेट्स घेतल्या आहेत, त्याची इकॉनॉमी ७.०२ आहे.