Star Sports reply to Rohit Sharma : रोहित शर्मा आणि स्टार स्पोर्ट्सचे प्रकरण आता वेगळ्या पातळीवर पोहोचताना दिसत आहे. रोहित शर्माने काही दिवसांपूर्वी आरोप केला होता की त्याचे वैयक्तिक संभाषण देखील टीआरपीसाठी प्रसारित केले गेले होते, परंतु त्याने त्यास नकार दिला होता. मात्र आता स्टार स्पोर्ट्सने मुंबई इंडियन्सच्या माजी कर्णधाराला प्रत्युत्तर दिले आहे. स्टार स्पोर्ट्सने एक निवेदन जारी केले असून त्यात त्यांनी रोहित शर्माचे आरोप स्पष्टपणे फेटाळले आहेत. स्टार स्पोर्ट्सने म्हटले आहे की, त्यांनी रोहित शर्माचा कोणताही ऑडिओ ऑन एअर चालवलेला नाही.

काय म्हणाले स्टार स्पोर्ट्स?

रोहित शर्माला उत्तर देताना स्टार स्पोर्ट्सने सांगितले की, “रोहित शर्माच्या संभाषणाची क्लिप १६ मे वानखेडे स्टेडियममधील आहे. ती क्लिप प्रसारित करण्याचे अधिकार स्टार स्पोर्ट्सकडे होते. त्या व्हिडीओमध्ये रोहित शर्मा त्याच्या मित्रांसोबत बोलत होता. आम्ही त्या क्लिपचा कोणताही ऑडिओ किंवा संभाषण रेकॉर्ड किंवा प्रसारित केले नाही. तो व्हिडीओ फक्त प्री-शोसाठी वापरला होता, पण त्यात ऑडिओ रेकॉर्ड नव्हता.”

Suraj revanna brother of Prajjwal Revanna
प्रज्ज्वल रेवण्णाच्या भावाचे तरुणावर लैंगिक अत्याचार? आरोप करणाऱ्यावर सुरज रेवण्णाकडून गुन्हा दाखल
live-in relationship,
लिव्ह-इन नात्याची वैधता आणि वारसाहक्क…
Skoda Kushaq mid-spec Onyx trim now available with AT Here’s how much it costs
Skodaने भारतात लॉन्च केली Kushaq Mid-Spec Onyx, ऑटोमॅटिक ट्रान्समिशन व्हेरिएंटसह मिळतील ही’ खास वैशिष्ट्ये
pune Porsche car accident
अगरवालचा भागीदार अटकेत, जमीन खरेदी व्यवहार प्रकरणात छोटा राजनच्या नावाने धमकी
RBI policy, Reserve Bank of India
‘EMI कमी होणार नाही’, रिझर्व्ह बँकेचा रेपो रेट आठव्यांदा ‘जैसे थे’
Sangli, case, obscene videos,
सांगली : इन्स्ट्राग्रामवर अश्लिल चित्रफीत प्रसारित केल्याबद्दल गुन्हा दाखल
Kalyaninagar accident case Agarwal couple have Original blood sample how many others are involved in this case
कल्याणीनगर अपघात प्रकरण : रक्ताचा मूळ नमुना अगरवाल दाम्पत्याकडे? या प्रकरणात आणखी काही जण सामील
china gray zone tactics against taiwan
विश्लेषण : तैवानला जेरीस आणण्यासाठी चीनचे ‘ग्रे झोन ॲग्रेशन’… काय आहे ही व्यूहरचना?

केकेआरमुळे रोहित आणि स्टार स्पोर्ट्सची जुंपली –

रोहित शर्माचा व्हिडिओ आणि ऑडिओ केकेआरने आपल्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट केला होता. त्या व्हिडीओवरून झालेल्या वादानंतर केकेआरने तो सोशल मीडियावरून हटवला. या ऑडिओमुळे रोहित शर्माला खूप त्रास झाला आणि त्यामुळेच त्याने सोशल मीडियावर थेट स्टार स्पोर्ट्सवर मोठे आरोप केले. मात्र, चॅनलने स्पष्टपणे म्हटले आहे की ते खेळाडूंच्या गोपनीयतेचा आदर करतात.

हेही वाचा – IPL 2024 : आरसीबीच्या खेळाडूंशी हस्तांदोलन टाळल्यानंतर धोनीचा शोध घेतानाचा विराट कोहलीचा VIDEO व्हायरल

काय म्हणाला होता रोहित शर्मा?

रोहितने सोशल मीडियावर पोस्ट करताना लिहले होते की, “खेळाडूंच्या आयुष्यातल्या खाजगी गोष्टी जाहीर केल्या जात आहेत. कॅमेरे तुमचे प्रत्येक बोलणे, हावभाव, कृती टिपत आहेत. तुम्ही मित्रांबरोबर, घरच्यांबरोबर, संघातील सहकाऱ्यांबरोबर, सरावावेळी जे जे बोलता ते सगळं टिपले जात आहे. मी बोलत असताना रेकॉर्ड करू नका अशी विनंती करुनही स्टार स्पोर्ट्सने चित्रीकरण केले. नुसते चित्रीकरण करुन थांबले नाहीत तर ते प्रसारितही केले. हा गोपनीयतेचा भंग आहे”. त्याने पुढे लिहिले की, ‘त्यांना एक्सक्लुसिव्ह कंटेंट हवा आहे. व्ह्यूज हवे आहेत, एंगजेमेंट हवी आहे. पण या सगळ्याच्या नादात तुम्ही चाहते, खेळाडू आणि क्रिकेट यांच्यातला विश्वासाला तडा घालवत आहात.”