आयपीएल २०२५ चा यंदाचा हंगाम संघातील बदलांमुळे यंदा स्पर्धा चुरशीची होणार होतीच, त्याचप्रमाणे स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेच्या सुरूवातीपासूनच आपण अनेक जाहिराती पाहत होतो. या जाहिरातीपैकी रोहित शर्माच्या जाहीरातीने सर्वांचं लक्ष वेधलं होतं, ज्यामध्ये रोहितने आपली कार भेट म्हणून देणार असल्याचं म्हटलं होतं. आता रोहितने ही कार विजेत्या स्पर्धकाला भेट म्हणून दिली आहे. ज्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.

आयपीएल २०२५च्या प्लेऑफच्या शर्यतीत आता ३ संघ आहेत, कारण ३ संघ आधील प्लेऑफसाठी पात्र झाले आहेत. मुंबई इंडियन्स संघ हा चौथ्या स्थानासाठी फेव्हरेट असल्याचे म्हटले जात आहे. तर लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्सचे संघही स्पर्धेत कायम आहेत. दरम्यान रोहित शर्मा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे.

मुंबई इंडियन्सच्या रोहित शर्माने सोमवार, १९ मे रोजी फॅन्टसी क्रिकेट स्पर्धेतील विजेत्यांपैकी एकाला त्याची मौल्यवान लॅम्बोर्गिनी उरुस ही कार दिली. मुंबईच्या रस्त्यांवर अनेकदा आयकॉनिक निळ्या लॅम्बोर्गिनीमध्ये फिरताना दिसणारा रोहित त्याची हीच कार एका भाग्यवान विजेत्याला देताना दिसला. रोहितच्या या कारचा नंबरही तितकाच ऐतिहासिक आहे.

रोहितची ‘२६४’ क्रमांक असलेली लॅम्बोर्गिनी ही कार दीर्घकाळापासून त्याच्याकडे आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याच्या २६४ धावांच्या विश्वविक्रमी खेळीचा आकडा त्याने या कारला नंबर म्हणून दिला आहे. मार्केटमध्ये या लॅम्बोर्गिनीची किंमत सुमारे ४ कोटी रुपये आहे. ही लक्झरी एसयूव्ही गेल्या काही वर्षांत चाहत्यांच्या पसंतीची बनली आहे, कारण ती भारतीय कर्णधारा रोहित शर्माकडे देखील हीच कार आहे.

आयपीएल २०२५ च्या सुरुवातीला, रोहितने ड्रीम११ च्या जाहिरातीत विनोदी पद्धतीने कार देण्याचे आश्वासन दिले होते, रोहितची ही जाहिरात व्हायरल झाली होती. दोन भागांच्या या जाहिरातीत, रोहित प्रथम भावनिकपणे ही गाडी देण्याची घोषणा करताना दिसला आणि नंतर त्याच्या कारमधून एका चाहता त्याची कार घेऊन जाताना दिसत होता. ज्यामुळे भारतीय कर्णधाराला रिक्षातून घरी जावं लागलं होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुरुवातीला चाहत्यांना प्रश्न पडला होता की विजेत्याला रोहितची ही कार मिळणार की नवी कार मिळणार आहे. पण आता रोहितने त्याची कार देताना पाहून चाहते चकित झाले आहेत. रोहित शर्मा या कारची चावी देतानाचा व्हीडिओ आता व्हायरल होत आहे.