Sanju Samson breaks Shane Warne’s record : आयपीएलच्या १७व्या हंगामातील ६१ वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स संघात खेळला गेला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सीएसकेविरुद्धच्या सामन्यात नाणेफेक होताच, संजू सॅमसनने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने शेन वॉर्नला मागे टाकले आहे. आयपीएल २०२४ च्या प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी राजस्थान रॉयल्ससाठी हा सामना जिंकणे खूप महत्वाचे आहे.

संजू सॅमसन आयपीएल २०२१ पासून राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व करत आहे. चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात नाणेफेक होताच, तो सर्वाधिक सामन्यांमध्ये राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व करणारा खेळाडू ठरला आहे. संजू सॅमसनने ५७ सामन्यात राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व केले आहे. जे इतर कर्णधारांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. या बाबतीत संजूने शेन वॉर्न आणि राहुल द्रविडसारख्या दिग्गज खेळाडूंना मागे टाकले आहे. शेन वॉर्नने ५६ सामन्यांमध्ये राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व केले आहे. तर राहुल द्रविडने ४० सामन्यांमध्ये राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व केले आहे.

Virat Kohli comes now it seems like he can be dismissed without any issues says Aakash Chopra
Virat Kohli : ‘आता असं वाटतं की विराटला कोणत्याही अडचणीशिवाय…’, भारताच्या रनमशीनबद्दल आकाश चोप्राचे मोठे वक्तव्य
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
How India lost in Test matches against New Zealand Where exactly did the Indian team go wrong
रोहित, विराट सुमार; युवकांतही सातत्याचा अभाव! भारतीय संघाचे नेमके चुकले कुठे?ऑस्ट्रेलियाविरुद्ध कितपत सज्ज?
Rohit Sharma Statement Rishabh Pant Controversial Wicket in IND vs NZ Mumbai test said The bat was close to the pads
IND vs NZ: “सर्वांसाठी सारखेच नियम ठेवा…”, ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर रोहित शर्मा भडकला, खरंच पंत नॉट आऊट होता?
Shubman Gill Overtakes Cheteshwar Pujara
Shubman Gill : शुबमन गिलने चेतेश्वर पुजाराला मागे टाकत केली खास कामगिरी, रोहित शर्माच्या स्पेशल क्लबमध्ये झाला सामील
Rishabh Pant Shubman Gill Hits Fiery Fifty against New Zealand as India Got Good Start IND vs NZ 3rd Test Day 2
IND vs NZ: भारतीय संघाची टी-२० स्टाईल सुरूवात, पंत-गिलची झंझावाती अर्धशतकं; किवी गोलंदाजांना दिवसा दाखवले तारे
Virat Kohli Broke Sachin Tendulkar World Record of Most Runs After First 600 Innings in International Cricket
Virat Kohli: ४ धावांवर धावबाद झाल्यानंतरही विराट कोहलीने मोडला सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम, ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला फलंदाज
IND vs PAK Hong Kong Super 6 Pakistan Beat India by 7 Wickets Robin Uthappa Manoj Tiwary
IND vs PAK: पाकिस्तानने ५ षटकांत भारताचा केला पराभव, एकही विकेट न गमावता गाठले १२० धावांचे लक्ष्य

सर्वाधिक सामन्यांमध्ये राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व करणारे खेळाडू:

संजू सॅमसन- ५७ सामने
शेन वॉर्न- ५६ सामने
राहुल द्रविड- ४० सामने
स्टीव्ह स्मिथ- २७ सामने
अजिंक्य रहाणे- २४ सामने

हेही वाचा – ‘परदेशी खेळाडूंची फी कापून घ्यावी, बोर्डालाही मिळू नयेत पैसे…’ जाणून घ्या सुनील गावसकरांच्या वक्तव्यामागील कारण

संजूच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सची कामगिरी –

संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स संघाने ३० सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर संघाला २६ सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. तो मैदानावर शांत राहतो आणि गोलंदाजीत योग्य बदल करतो. त्याच्याच नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स संघाने आयपीएल २०२२ मध्ये अंतिम फेरी गाठली होती. जिथे गुजरात टायटन्सविरुद्ध संघाचा पराभव झाला होता.
आजच्या सामन्याबद्दल बोलायचे तर, सिमरजित सिंग आणि तुषार देशपांडे यांच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने राजस्थान रॉयल्सला २० षटकांत ५ गड्यांच्या मोबदल्यात १४१ धावांवर रोखले.

हेही वाचा – CSK vs RR : एमएस धोनीचा चेन्नईत शेवटचा IPL सामना? CSK च्या ‘त्या’ पोस्टने चाहत्यांची वाढली धाकधूक

राजस्थानकडून रियान परागने ३५ चेंडूंत एक चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने नाबाद ४७ धावा केल्या. चेन्नईकडून सिमरजीतने तीन, तर तुषारने शेवटच्या षटकात दोन बळी घेतले. मात्र, या सामन्यात राजस्थानची फलंदाजी खूपच खराब झाली. संघाचे फलंदाज सुरुवातीपासूनच धावा काढण्यासाठी धडपडताना दिसले. चेन्नईसाठी सिमरजीत सिंगने शानदार गोलंदाजी केली आणि राजस्थानला सुरुवातीचा धक्का दिला, ज्यामुळे त्याच्या इतर फलंदाजांवर दबाव वाढला. यातून राजस्थानचे फलंदाज शेवटपर्यंत सावरले नाहीत आणि १५० धावाही करू शकले नाहीत.