Sourav Ganguly Tweet For Shubman Gill Goes Viral : रविवारी झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पराभव केला पण विराट कोहलीच्या दमदार शतकाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. अशातच विराटच्या अप्रतिम फलंदाजीबाबत संपूर्ण क्रीडाविश्वातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विराटप्रमाणे गुजरातचा स्टार फलंदाज शुबमन गिलनेही शानदार शतक ठोकून गुजरातच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. गिलच्या शतकानंतर बीसीसीआयचे माजी चेअरमन आणि टीम इंडियाचे माजी कर्णधार सौरव गांगुलीने गिलच्या इनिंगबाबत ट्वीट केलं आहे.

सौरव गांगुलीच्या ट्वीटची तुफान चर्चा

सौरव गांगुलीनं ट्वीट करत म्हटलं की, हा देश किती प्रतिभावंत माणसांना जन्म देतो. शुबमन गिल..वाह..दोन सामन्यात दोन जबरदस्त शतक..आयपीएल…टूर्नामेंटमध्ये अप्रतिम दर्जा पाहायला मिळत आहे @ बीसीसीआय.. गांगुलीनं गिलबाबक केलेल्या या ट्वीटमुळं आरसीबीच्या चाहत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यानंतर आरसीबीच्या चाहत्यांनी गांगुलीच्या ट्वीटला रिट्वीट करून त्यांची भूमिका मांडली आहे. गिल आणि विराट दोघांनीही जबरदस्त फलंदाजी करून शतकी खेळी केली. आरसीबीकडून खेळताना मागील सामन्यात सनरायझर्सविरोधात विराटने ६१ चेंडूत नाबाद १०१ धावा केल्या. ज्यामध्ये १३ चौकार आणि १ षटकाराचा समावेश आहे.

ipl 2024 shubman gill fan girl shaini jetani trolled fans saying she making gujarat titans captain lose his focus
“शुबमन गिल तुझ्यामुळे आउट होतोय”; चाहतीच्या ‘त्या’ VIDEO तील कृत्यांवर भडकले नेटिझन्स; म्हणाले, “स्वप्न…”
Former Zimbabwean cricketer Guy Whittle
Guy Whittall : धक्कादायक! माजी क्रिकेटरवर बिबट्याचा जीवघेणा हल्ला, कुत्र्याने वाचवला जीव, रक्ताने माखलेला फोटो व्हायरल
Virat Kohli Dancing on Chiku Chants While Fielding
विराट कोहलीला चिकू हाक मारताच त्यानं फिल्डिंग सोडून केलं असं काही..चाहते झाले थक्क; पाहा Video
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: धोनीच्या वादळी खेळीने आनंद महिंद्राही झाले चकित, माहीचे कौतुक करताना म्हणाले, “कृतज्ञ आहे की माझं नाव Mahi-ndra…”

नक्की वाचा – …अन् विराट कोहलीनं शुबमन गिलला भर मैदानात मिठी मारली, शतकवीरांचा Video पाहून तुमचेही डोळे पाणावतील

गुजरात टायटन्सविरोधात आरसीबीने ५ विकेट्स गमावून १९७ धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर या धावांचा पाठलाग करताना गिलने ५२ चेंडत १०४ धावांची नाबाद खेळी केली. यामध्ये ५ चौकार आणि ८ षटकारांचा समावेश आहे. विराट कोहलीच्या सलग दुसऱ्या शतकावर गिलची विजयी शतकी खेळी सर्वांच्याच भुवया उंचावून गेली. गुजरात टायटन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पराभव केल्यानं आरसीबी आयपीएलमधून बाहेर झाली असून मुंबई इंडियन्सने प्ले ऑफमध्ये प्रवेश केला आहे.