Ayush Mhatre CSK: मुंबईकर युवा फलंदाज आयुष म्हात्रेने आयपीएल २०२५ मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना एक नवीन विक्रम केला आहे. त्याने केवळ १७ वर्षे आणि २९१ दिवसांत, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध अर्धशतक झळकावले आणि आयपीएलमध्ये अर्धशतक झळकावणारा तिसरा सर्वात तरुण फलंदाज होण्याचा मान मिळवला. या दिमाखदार खेळीसह, आयुष म्हात्रेने चेन्नई सुपर किग्सचा माजी दिग्गज फलंदाज सुरेश रैनाचा १७ वर्ष जुना विक्रम मोडला, ज्याने २००८ मध्ये २१ वर्षे आणि १४८ दिवसांच्या वयात मुंबई इंडियन्सविरुद्ध अर्धशतक झळकावले होते.

आयुष म्हात्रेने वेधले क्रिकेट जगताचे लक्ष

दरम्यान बंगळुरु विरुद्धच्या सामन्यात चेन्नईला जरी पराभव पत्करावा लागला असला तरी आयुष म्हात्रेने ९४ धावांची खेळी करत क्रिकेट जगताचे लक्ष वेधले आहे. अशात चेन्नई सुपर किंग्सचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग देखील आयुषच्या खेळीने प्रभावित झाले असून, त्यांनी आयुषचे तोंडभरून कौतुक केले आहे.

पाच आयपीएल जिंकणाऱ्या प्रशिक्षकाकडून कौतुक

आयुष म्हात्रे १७ वर्षे आणि २९२ दिवसांचा आहे, पण त्याच्याकडे एक अव्वल टी-२० क्रिकेटपटूची क्षमता आहे. त्याची फलंदाजी डोळ्याला आनंद देणारी आहे, तो मैदानात सर्वत्र फटके मारतो आणि त्याच्याकडे आधुनिक काळातील टी-२० फलंदाजासाठी आवश्यक असलेला पॉवर गेमही, असल्याचे चेन्नईचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी म्हटले आहे.

स्वभाव आणि संयम

पण चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांना आयुष म्हात्रेबद्दल सर्वात जास्त प्रभावित करणारी गोष्ट म्हणजे, त्याने चेन्नई संघात सहभागी होण्याआधी दिलेल्या चाचण्यांमध्ये दाखवलेला स्वभाव आणि संयम.

जबरदस्त हँड-आय कोऑर्डिनेश

“त्याच्याकडे प्रतिभा आहे. त्याचे हँड-आय कोऑर्डिनेश जबरदस्त आहे. त्याची बॅट स्विंग खूप सुंदर आहे. तो आक्रमक आहे. आधुनिक काळातील टी-२० खेळाडूमध्ये आपल्याला जे आवडते ते सर्वकाही आयुषकडे आहे”, असे फ्लेमिंग शनिवारी रात्री रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध चेन्नईच्या पराभवानंतर झाल्यानंतर पत्रकार परिषदेत म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फ्लेमिंग पुढे म्हणाले की, “पण, त्याचा स्वभाव आणि चाचणीत आणि नंतर मोठ्या व्यासपीठावर सर्वोत्तम कामगिरी करण्याच्या क्षमतेमुळे सर्वात जास्त प्रभावित झालो आहे. एखाद्या फलंदाजाकडे फटक्यांची विविधता असणे ही एक चांगली गोष्ट आहे, परंतु जगातील काही मोठ्या खेळाडूंसमोर मोठ्या व्यासपीठावर त्याचा योग्य वापर करण्याच्या क्षमतेची मी कौतुक करतो.”