टी-२० विश्वचषक २०२४ साठी लवकरच भारतीय संघाची घोषणा केली जाणार आहे. इंडियन प्रीमियर लीग २०२४ दरम्यान चांगली कामगिरी करणाऱ्या अनेक युवा आणि वरिष्ठ भारतीय खेळाडूंची नावे चर्चेचा विषय बनली आहेत. यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत हा त्यापैकीच एक. भीषण कार अपघातानंतर पंतने आयपीएलमध्ये जोरदार पुनरागमन केले आहे. गुजरातविरूद्धच्या सामन्यात यष्टीरक्षकाच्या भूमिकेत पंतने चांगली कामगिरी केली आहे,याकरता त्याला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला.

– quiz

डिसेंबर २०२२ मध्ये झालेल्या भीषण कार अपघातानंतर १४ महिने क्रिकेटपासून दूर राहिल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधाराने यावर्षी IPL मध्ये पुनरागमन केले. पंतने डीसीच्या पहिल्या सहा सामन्यांमध्ये १५७.७२ च्या प्रभावी स्ट्राइक रेटने १९४ धावा केल्या, ज्यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे. पंतची कामगिरी पाहता, इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडचा असा विश्वास आहे की जेव्हा भारतीय संघ जूनमध्ये टी-२० विश्वचषक खेळेल, त्या संघामध्ये पंत भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज असावा.

ब्रॉडने म्हणाला की, जेव्हा हंगाम सुरू झाला तेव्हा पंतच्या फिटनेसबद्दल त्याला शंका होती, परंतु कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात फलंदाजाचे विशेष शॉट पाहून ही शंका दूर झाली. ब्रॉडने स्टार स्पोर्ट्सशी संवाद साधताना सांगितले की, “वर्ल्डकपसाठी भारतीय संघाच्या निवडीबाबत खूप चर्चा सुरू आहे. त्या संघासाठी तुमचे काही खेळाडू प्रतिक्षेत आहेत. कदाचित ऋषभ पंत हा असा खेळाडू आहे ज्याच्याबद्दल बरीच चर्चा आहे. मी KKR विरुद्ध खेळताना त्याचा एक शॉट पाहिला होता, त्याने डीप स्क्वेअर लेगवर फ्लिक शॉट लगावत एक षटकार खेचला. ज्या क्षणी त्याने तो शॉट खेळला, मला वाटलं तो T20 विश्वचषक संघात असावा. तो खेळण्यासाठी पूर्णपणे तयार आहे.”

हेही वाचा-Rohit Sharma: ‘भारतीय क्रिकेट संघाला याचा काहीच फायदा नाही’, आयपीएलमधील इम्पॅक्ट खेळाडू नियमाबद्दल रोहितचे मोठे वक्तव्य

ब्रॉडने पंतच्या चांगल्या कामगिरीसह त्याच्या वर्कलोड मॅनेजमेंटवरही भर दिला पाहिजे. इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज म्हणाला की, “डीसी पंतला “काही सामन्यांमध्ये” फलंदाज म्हणून वापरू शकते; हंगामाच्या सुरुवातीला, लखनऊ सुपर जायंट्सने त्यांचा कर्णधार केएल राहुलचा इम्पॅक्ट खेळाडू म्हणून वापर केला, निकोलस पूरनने संघाचे नेतृत्व केले.”

तो म्हणाला, “त्याच्या नावे मोठी रक्कम आहे,तो इतके दिवस खेळापासून लांब होता. तो संघाचा कर्णधार आहे, यष्टीरक्षक आहे, तो तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. ब्रॉड म्हणाला, मला पंतला काही सामन्यांमध्ये इम्पॅक्ट खेळाडू म्हणून खेळताना पाहायचा आहे, त्याच्या खांद्यावरून थोडं कामाचं ओझं कमी करता येईल.”

हेही वाचा-VIDEO: शेवटच्या हंगामात दिनेश कार्तिकची धूम; पल्लेदार षटकार आणि झुंजार इनिंग्ज

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माजी क्रिकेटपटू म्हणाला, “पण त्याने तो शॉट खेळताच… तो शॉट खेळण्याचा त्याचा हेतू नव्हता, त्याने लाइन पाहिली आणि फटका खेळला जो षटकारासाठी गेला आणि मला वाटले त्याने वर्ल्डकपमध्ये खेळायला हवे. त्याच्या या शॉट्सवर समजते की त्याची मॅच शार्पनेस किती तीक्ष्ण आहे. तो मॅचविनर खेळाडू आहे, त्यामुळे मला वाटते की मी निवडकर्ता असतो तर तो विश्वचषक संघात माझा यष्टिरक्षक असेल.”