IPL 2025 Virat Kohli Record in T20 cricket: आयपीएल २०२५ च्या लीग स्टेजमधील अखेरच्या सामन्यात विराट कोहलीने एक अनोखा विक्रम आपल्या नावे केला आहे. लीग स्टेजमधील अखेरचा सामना आरसीबी वि. लखनौ यांच्यात खेळवला जात आहे. या सामन्यात लखनौने प्रथम फलंदाजी करताना ऋषभ पंतच्या शतकी खेळीच्या जोरावर २२६ धावांचा डोंगर उभारला. यादरम्यान प्रत्युत्तरात विराटने विक्रम रचत अर्धशतक केले आहे.

भारतीय क्रिकेटमधील रनमशीन विराट कोहलीने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीचे कौशल्य सिद्ध करून इतिहास लिहिला आहे. इंडियन प्रीमियर लीग २०२५ च्या शेवटच्या लीग स्टेज सामन्यात त्याने असा पराक्रम केला जो आतापर्यंत जगातील कोणत्याही फलंदाजाला करता आला नाही.

एकाना क्रिकेट स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध विराट कोहलीने शानदार खेळी केली. त्याने ३० चेंडूंमध्ये १० चौकारांच्या मदतीने १८० च्या स्ट्राईक रेटने ५४ धावा केल्या. यासह त्याने आयपीएलमध्ये आपले ९ हजार धावा पूर्ण केल्या. विशेष म्हणजे त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना या सर्व धावा केल्या आहेत. यासह, त्याने टी-२० क्रिकेटमध्ये एकाच संघासाठी ९००० धावा पूर्ण करण्याचा विश्वविक्रम केला आहे. याशिवाय, कोणताही खेळाडू एका संघासाठी ७००० टी-२० धावाही करू शकलेला नाही.

टी२० मध्ये एका संघासाठी सर्वाधिक धावा

९०००+ धावा – विराट कोहली, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
६०६० धावा – रोहित शर्मा, मुंबई इंडियन्स
५९३४ धावा – जेम्स विन्स हॅम्पशायर
५५२८ धावा – सुरेश रैना, चेन्नई सुपर किंग्स
५३१४ धावा – एमएस धोनी, चेन्नई सुपर किंग्स

विराट कोहलीने या खेळीसह आयपीएल २०२५ मध्ये त्याचे ६०० धावा पूर्ण केले. त्याने पाचव्यांदा एका हंगामात ६०० धावा करण्याचा पराक्रम केला आहे. यासह, तो एका हंगामात सर्वाधिक वेळेस ६०० धावा करणारा फलंदाज बनला आहे. त्याच वेळी, त्याच्याकडे आता आयपीएलमध्ये ६३ अर्धशतकं आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक अर्धशतकं करणारा फलंदाजही बनला आहे. यापूर्वी त्याने डेव्हिड वॉर्नरची बरोबरी केली होती. विराट कोहलीने चालू हंगामात आठव्यांदा अर्धशतक केलं आहे, जे इतर खेळाडूंच्या तुलनेत सर्वाधिक आहेत.