Rahul Tripathi getting emotional after run out video : आयपीएल २०२४ पहिला क्वालिफायर सामना सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात कोलकात्याच्या गोलंदाजांनी पहिल्याच षटकापासूनच अप्रतिम गोलंदाजी करत हैदराबादला दडपणाखाली आणले. हैदराबादचा राहुल त्रिपाठी हा एकमेव फलंदाज होता, ज्याने गोलंदाजांचा सामना केला पण आंद्रे रसेलच्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणामुळे त्याला धावबाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. या धावबादनंतर तो निराश होऊन परतला आणि ड्रेसिंग रुममध्ये न पायऱ्यांवर खाली मान घालून भावूक झाल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

राहुल त्रिपाठीने झळकावले अर्धशतक –

राहुल त्रिपाठीने धावबाद होण्यापूर्वी सनरायझर्स हैदराबादसाठी शानदार फलंदाजी केली. त्रिपाठीने चांगली फलंदाजी करत आपल्या संघासाठी ३५ चेंडूत ७ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ५५ धावांची शानदार खेळी केली. सनरायझर्स हैदराबादचा राहुल त्रिपाठी हा एकमेव फलंदाज होता, ज्याने आक्रमक फटके खेळून कोलकाता नाईट रायडर्सच्या गोलंदाजांवर सतत दबाव राखण्याचा प्रयत्न केला.

Shikhar Dhawan and Mithali Raj Marriage Talks
‘मी मिताली राजशी लग्न करत आहे…’, शिखर धवनचा मोठा खुलासा, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण?
What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!
IPL 2024 Prize money updates in marathi
IPL 2024 Prize Money : जेतेपदानंतर कोलकाता टीम मालामाल, उपविजेत्या हैदराबादवरही पैशांचा पाऊस
Nagpur Results Nitin Gadkari Major Win Can Change Prime Minister Power Game
नितीन गडकरींचा विजय पालटणार सत्तेचा खेळ? ज्योतिषतज्ज्ञ म्हणतायत, “२०२४ पर्यंत काळजी, तर २०२६ ला मोठा..”
nilesh lanke sharad pawar
“निलेश लंकेंना संसदेत पाहून लोक विचारतील, हा कोण…”, शरद पवारांचं वक्तव्य; म्हणाले, “ते मराठीत काय बोलतील…”
Ravichandran Ashwin Calls Sanju Samson Selfish After RR Captain Selected For T20 World Cup
“तो स्वार्थीपणे खेळतोय..”, अश्विनने संजु सॅमसनची विश्वचषकाच्या संघात निवड होताच केलं मोठं विधान; म्हणाला,”त्याची गरज..”
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत

सनरायझर्स हैदराबादच्या डावाच्या १४व्या षटकात राहुल त्रिपाठीने सुनील नारायणचा चेंडू हलक्या हातांनी खेळला आणि तो धावा काढण्यासाठी धावला. मात्र, आंद्रे रसेलने चेंडू लगेच पकडला आणि लगेचच चेंडू स्ट्रायकरच्या एंडकडे फेकला. या दरम्यान राहुल त्रिपाठीने अब्दुल समद अजिबात पाहिले नाही आणि तो धाव घेण्यासाठी धावत सुटला. एकेकाळी दोन्ही फलंदाज एकाच टोकाला उभे होते. यावेळी कोलकाता नाईट रायडर्सचा यष्टिरक्षक आर. गुरबाजने राहुल त्रिपाठीला धावबाद केले.

हेही वाचा – VIDEO : स्टार्कच्या भेदक चेंडूवर हेडच्या दांड्या गुल, मागे वळून पाहातच राहिला; नेमकं काय घडलं?

राहुल त्रिपाठी धावबादनंतर भावूक –

राहुल त्रिपाठी पॅव्हेलियनमध्ये परतताच तो रडताना दिसला. एका महत्त्वाच्या सामन्यात आणि कठीण परिस्थितीत धावबाद झाल्यामुळे राहुल त्रिपाठी खूप निराश झाला होता. तो आऊट झाल्यानंतर सनरायझर्स हैदराबादची स्थिती अत्यंत बिकट झाली. ज्यामुळे त्यांना या सामन्यात पुनरागमन करत आले नाही. संघाची अवस्था इतकी खराब झाली की १५ षटकांत एसआरएचची धावसंख्या ६ विकेट्सवर १२५ धावा होती. कर्णधार पॅट कमिन्स कसा तरी डाव पुढे नेण्याचा प्रयत्न करत होता. पॅट कमिन्स आणि विजयकांत यांच्यात शेवटच्या विकेटसाठी ३३ धावांची भागीदारी झाली होती, मात्र २० व्या षटकात कमिन्स ३० धावांवर बाद झाला. यासह एसआरएचने कोलकाताला १६० धावांचे लक्ष्य दिले आहे.

हेही वाचा – T20 WC2024 : “टीम इंडियाला त्याची उणीव भासेल, कारण तो २० चेंडूत…’, ‘या’ खेळाडूबद्दल हरभजन सिंगचे मोठे वक्तव्य

सात फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला नाही –

सनरायझर्स हैदराबाद हा तोच संघ आहे, ज्याने २०२४ मध्ये आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा केल्या होत्या. यंदाच्या हंगामात एसआरएचने आरसीबीविरुद्ध २८७ धावा केल्या होत्या. पण पहिल्या क्वालिफायर सामन्यात केकेआरविरुद्ध हैदराबादला यश मिळाले नाही. संघासाठी केवळ राहुल त्रिपाठी, हेन्रिक क्लासेन, अब्दुल समद आणि कर्णधार पॅट कमिन्स धावांच्या बाबतीत दुहेरी आकडा गाठू शकले. म्हणजे, संघाचे सात फलंदाज त्यांच्या डावात १० धावाही करू शकले नाहीत. विशेष म्हणजे त्यापैकी चार खेळाडू असे होते ज्यांना आपले खातेही उघडता आले नाही.