आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या इराणच्या फुटबॉल संघाच्या एका पदाधिकाऱ्याने एका महिला स्वयंसेवकाची लैंगिक छळवणूक केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून त्याला हॉटेल सोडून जाण्यास मनाई करण्यात आली आहे.
इराणच्या फुटबॉल संघाचा इनशिआन येथील अन्सानवा स्टेडियमवर सराव सुरू आहे. सरावाच्या वेळी या पदाधिकाऱ्याने एका महिला स्वयंसेवकाबरोबर स्वत:ची छायाचित्रे काढली व नंतर त्याने लैंगिक छळवणूक करण्याचा प्रयत्न केला. पोलीस निरीक्षक पार्क मिनजुओ यांनी याबाबत सांगितले, या पदाधिकाऱ्याने छळवणूक केल्याचा ठोस पुरावा नाही मात्र आम्ही याबाबत संबंधित स्वयंसेवक व तेथे उपस्थित असलेल्या अन्य संघटकांचा जबाब घेत आहोत. या पदाधिकाऱ्याला अद्याप ताब्यात घेतलेले नाही, मात्र त्याने पोलिसांची परवानगी घेतल्याशिवाय हॉटेल सोडू नये अशी सूचना आम्ही त्याला केली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 17th Sep 2014 रोजी प्रकाशित
इराणच्या फुटबॉल पदाधिकाऱ्यावर लैंगिक छळवणुकीचा संशय
आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या इराणच्या फुटबॉल संघाच्या एका पदाधिकाऱ्याने एका महिला स्वयंसेवकाची लैंगिक छळवणूक केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून त्याला हॉटेल सोडून जाण्यास मनाई करण्यात आली आहे.
First published on: 17-09-2014 at 12:03 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Iran soccer official suspected of sex harassment