ग्वाल्हेर : मुंबईकर यशस्वी जैस्वालने आपल्यातील प्रतिभा व गुणवत्ता सिद्ध करताना झळकावलेले द्विशतक आणि त्याला साथ देताना सलामीवीर अभिमन्यू ईश्वरनने केलेले शतक यामुळे बुधवारपासून सुरू झालेल्या इराणी चषकाच्या सामन्यात शेष भारताने मध्य प्रदेशविरुद्ध पहिल्या दिवसअखेर ३ बाद ३८१ धावांची मजल मारली.

ग्वाल्हेर येथे होत असलेल्या या सामन्यात शेष भारताचा कर्णधार मयांक अगरवालच्या कामगिरीकडे सर्वाचे लक्ष होते. परंतु त्याला केवळ २ धावांवर आवेश खानने माघारी पाठवले. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला यशस्वी (२५९ चेंडूंत २१३ धावा) आणि ईश्वरन (२४० चेंडूंत १५४) यांनी अप्रतिम फलंदाजी केली. या दोघांनी दुसऱ्या गडय़ासाठी ३७१ धावांची भागीदारी रचली. यशस्वीने आपल्या द्विशतकी खेळीत ३० चौकार आणि ३ षटकारांची, तर ईश्वरनने शतकी खेळीत १७ चौकार आणि २ षटकारांची आतषबाजी केली.

IPL 2024 Punjab Kings vs Mumbai Indians Match Updates in Marathi
IPL 2024: आयपीएलचे सर्व सीझन खेळलेल्या रोहित शर्माने रचला इतिहास, पंजाबविरूद्धचा सामना सुरू होताच हिटमॅनच्या नावे मोठी कामगिरी
Rohit first Indian to hit 500 sixes
MI vs CSK : रोहित शर्माने रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत कोणत्याच भारतीय खेळाडूला जमलं नाही ते करून दाखवलं
IPL 2024 Chennai Punjab Kings vs Sunrisers Hyderabad Match Updates in Marathi
IPL 2024: हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर सॅम करनने केली रिव्ह्यूची मागणी, करनच्या चतुराईमुळे असा बाद झाला राहुल त्रिपाठी; पाहा VIDEO
Rohit breaks Dhoni's sixes record
IPL 2024 MI vs DC : रोहित शर्माने मोडला धोनीचा विक्रम! वॉर्नर-कोहलीच्या ‘या’ खास क्लबमध्येही झाला सामील

ईश्वरनने आपले शतक पूर्ण करण्यासाठी १३५ चेंडू, तर यशस्वीने १५७ चेंडू घेतले. मात्र, यानंतर डावखुऱ्या यशस्वीने धावांची गती वाढवली. यशस्वीने पुढील १०० धावा केवळ ७३ चेंडूंतच फटकावल्या. ऑफ-स्पिनर सारांश जैन (०/१०३) आणि डावखुरा कुमार कार्तिकेय (०/९०) या मध्य प्रदेशच्या फिरकीपटूंना प्रभाव पाडता आला नाही.