एम.एस. धोनी ‘कॅप्टन कूल’ म्हणून ओळखला जातो. त्याच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाने अनेक स्पर्धांमध्ये यश मिळवलं. पण आता एका माजी भारतीय क्रिकेटपटूने धोनीवर स्वतःची कारकीर्द संपवल्याचा धक्कादायक आरोप केला आहे.

भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने धोनीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. यामागे त्याने कारण आणि घटना सांगत मोठा खुलासा केला. धोनीने त्याची कारकिर्द संपवल्याचं इरफान पठाणने म्हटलं आहे. इरफान पठाणने कसोटी सामन्यात पहिल्याच षटकात हॅटट्रिक घेण्याचा मोठा विक्रम केला होता. कसोटी सामन्यातील पहिल्याच षटकात इरफानने पाकिस्तानविरूद्ध २००६ मधील सामन्यात हॅटट्रिक घेतली होती. यासह त्याने भारताकडून २९ कसोटी सामने, १२० वनडे सामने आणि २४ टी-२० सामने खेळले आहेत आणि तो २०२० मध्ये निवृत्ती जाहीर केली.

इरफानला एकेकाळी भारतीय गोलंदाजीचे भविष्य मानले जात होते. त्याची स्विंग गोलंदाजी फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरत होती, जी हळूहळू ओसरली आणि टीम इंडियामध्येही इरफानचं स्थान निश्चित झालं नाही. एका मुलाखतीत इरफानने सांगितलं की,त्याला सातत्याने प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर ठेवलं जात होतं आणि त्याने याबाबत कोचला देखील थेट प्रश्न विचारला होता.

इरफान पठाणचे धोनीवर मोठे आरोप

कोचबरोबर झालेल्या बोलण्याबाबत इरफान पठाण म्हणाला, “२००९ मध्ये गॅरी कर्स्टनने मला सांगितलं की, तू चांगला खेळतो आहेस; पण युसूफ पठाण उत्कृष्ट खेळतोय, त्यामुळे संघ त्याची निवड करत आहे. आम्ही तेव्हा न्यूझीलंडमध्ये होतो. त्यापूर्वी मी आणि युसूफने श्रीलंकेमध्ये भारत गमावलेला असलेला सामना जिंकून दिला होता. संघाला २९ चेंडूत विजयासाठी ६० धावांची गरज होती आणि संघाने ७ विकेट्स गमावले होते आणि त्यानंतरही आम्ही जिंकलो होतो. पण त्यांच्या जागी इतर कोणी असत तर अशा सामना जिंकून देणाऱ्या खेळाडूंना कमीत कमी वर्षभरासाठी नक्कीच ड्रॉप केलं नसतं.”

“मी गॅरी कर्स्टनला मला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी का मिळत नाहीये याबद्दलही विचारलं, जेणेकरून मी माझ्या खेळण्यात सुधारण करू शकतो. त्यांनी मला दोन कारणं दिली. पहिलं म्हणजे काही गोष्टी त्यांच्या हातात नाहीत आणि मी जेव्हा त्यांना विचारलं की हे निर्णय कोण घेतंय, तेव्हा ते मला म्हणाले; मी तुला सांगू शकत नाही,” असं इरफान पठाणने लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

“प्लेईंग इलेव्हनची निवड कर्णधाराने केली होती. इरफानची संघात गरज नाही, हा निर्णय धोनीने घेतला होता. तो निर्णय योग्य होता की चुकीचा, यात मी पडू इच्छित नाही.”, कारण प्रत्येक कर्णधाराला त्याच्या इरफान पठाणने सांगितलं.

“जर एखादा खेळाडू संघाचा भाग आहे तर आपल्याला खेळण्याची संधी मिळावी, अशी त्याची इच्छा असते. एक खेळाडू म्हणून मी एखादी तरी सामना खेळला पाहिजे होता असं मला वाटतं आणि प्रत्येक खेळाडूने तसा विचार केला पाहिजे. माझा भाऊ युसूफ पठाण फलंदाजी अष्टपैलू खेळाडू होता आणि मी गोलंदाजी अष्टपैलू खेळाडू होतो, त्यामुळे दोघेही एका प्लेईंग इलेव्हन खेळू शकलो असतो.”, इरफान बोलताना पुढे म्हणाला.