ICC World Cup 2023: आशिया चषक २०२३मध्ये शनिवारी भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात इशान किशनने दमदार कामगिरी करून सर्वांची मने जिंकली. यानंतर दिग्गज क्रिकेटपटूंमध्ये के.एल. राहुल आणि इशान किशन यांच्या विश्वचषक २०२३मध्ये समावेश करण्याबाबत वाद सुरू झाला आहे. आशिया चषकाच्या सुरुवातीच्या दोन सामन्यांमधून राहुल बाहेर पडल्यानंतर पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात किशनचा समावेश करण्यात आला. जिथे या फलंदाजाने ८१ चेंडूत ८२ धावांची शानदार खेळी केली.

इशानच्या या खेळीमुळे भारताने राहुलला आशिया चषकाच्या सुपर फोर टप्प्यासाठी संघात तंदुरुस्त केल्यावर त्याची निवड करावी की नाही यावरून वादाला तोंड फुटले आहे. त्याआधी गौतम गंभीर आणि मोहम्मद कैफ यांच्यात विश्वचषक २०२३मध्ये एकदिवसीय संघात इशान आणि राहुल यापैकी कोण असावे यावरून वाद झाला. विश्वचषकातील प्लेइंग इलेव्हनसाठी पहिली पसंती यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून कोण असावा? यावर त्या दोघांनी वेगवेगळी मते व्यक्त केली आहेत.

sandeep sharma got emotional on unsold ipl 2024 auction after rr vs mi match
RR vs MI: “दोन वर्षांपूर्वी मला कोणी विकत घेतले नाही, पण…” मुंबई इंडियन्सच्या ५ विकेट घेतल्यानंतर संदीप शर्माने व्यक्त केली मनातील ‘ही’ भावना
IPL 2024 Gujarat Titans vs Delhi Capitals Match Updates in Marathi
IPL 2024: ‘तू वेडा आहेस का?’ लाइव्ह मॅचमध्ये आपल्याच संघातील खेळाडूवर कुलदीप यादव भडकला, पंतने असं शांत केलं प्रकरण; पाहा VIDEO
IPL 2024 RR vs PBKS Match Updates in marathi
PBKS vs RR : युजवेंद्र चहलला इतिहास रचण्याची सुवर्णसंधी! IPL मध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरणार पहिलाच गोलंदाज
Despite the efforts of PR Sreejesh the Indian hockey team lost
श्रीजेशच्या प्रयत्नांनंतरही भारतीय हॉकी संघाचा पराभव

गौतम गंभीरच्या मते इशान किशनला पुढे खेळू द्यावे आणि कैफ म्हणतो की दोघांना प्लेईंग ११मध्ये परिस्थितीनुसार संधी द्यावी. यावर गंभीर म्हणाला की, “एकाच वेळी दोन विकेटकीपर संघात घेण्यापेक्षा सूर्यकुमार यादवला संधी द्यावी. जर ६० चेंडूत ९० धावा हव्या असतील तर यावेळी तो टीम इंडियासाठी उपयुक्त खेळाडू ठरू शकतो.”

आता या वादाला सोमवारी नवे वळण मिळाले जेव्हा स्टार स्पोर्ट्सने रवी शास्त्री, डॉमिनिक कॉर्क आणि मॅथ्यू हेडन यासारख्या खेळाडूंना विश्वचषक संघाचा निर्णय देण्यासाठी एकत्र केले. यावेळी या तिन्ही दिग्गजांनी वेगवेगळे उपाय शोधून काढले जे शेवटी निवडकर्त्यांची डोकेदुखी कमी करू शकतात.

हेही वाचा: IND vs NEP: नवख्या नेपाळच्या फलंदाजांनी काढला टीम इंडियाच्या गोलंदाजांचा घाम, भारतासमोर विजयासाठी २३१ धावांचे लक्ष्य

इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूने कबूल केले की, “फॉर्मवर आधारित इशानची निवड करण्यापूर्वी निवडकर्त्यांसाठी ही चांगलीच डोकेदुखी असणार आहे.”दुसरीकडे कॉर्क म्हणाले की, “निवडकर्त्यांकडे संघात दोन स्टार फलंदाजांचा चांगला पर्याय असल्याने टीम इंडियासाठी ही सुवर्ण संधी असणार आहे. विश्वचषक ही दीर्घ स्पर्धा असल्याने, राहुलच्या दुखापतीच्या भीतीमुळे दोघांनाही अंतिम अकरामध्ये संधी मिळू शकते.”

माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी परिस्थितीनुसार प्लेईंग ११मध्ये यांचा समावेश करावा असे म्हटले. शास्त्री म्हणाले की, “विश्वचषकासाठी १५ जणांच्या संघात या दोघांचा समावेश करावा. इशान किशनला खेळपट्टी बघून संधी द्यावी कारण, मिडल ऑर्डरमध्ये लेफ्ट-राईट कॉम्बिनेशन संघासाठी फायद्याचे ठरेल.” हेडन यावर म्हणाला की, “यासाठी तुम्ही जडेजाचा देखील वापर करू शकतात. जर संघात अधिक अष्टपैलू खेळाडू असतील तर त्याचा अधिक फायदा होईल.”

हेही वाचा: IND vs AUS: विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, ‘हा’ धडाकेबाज खेळाडू भारताविरुद्धच्या मालिकेतून बाहेर

आयपीएल २०२३च्या सामन्यादरम्यान के. एल. राहुलला दुखापत झाली होती, त्यानंतर भारतीय यष्टीरक्षक फलंदाज एकही सामना खेळला नाही. मात्र शस्त्रक्रियेनंतर राहुल लवकरच संघात पुनरागमन करेल अशी अटकळ बांधली जात होती. आशिया चषकासाठी टीम इंडियाच्या संघात राहुलचाही समावेश करण्यात आला आहे, मात्र तो अद्याप एकही सामना खेळलेला नाही.