आशिया चषकात लागोपाठ दोन सामन्यांमधील पराभवानंतर स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर भारतीय संघ येऊन ठेपला आहे. यावर धक्का बसला नसून अनुभवाची गाठ हाताशी नसतानाही भारतीय गोलंदाजांनी उत्तम कामगिरी केल्याचा आनंद असल्याचे भारताचा कर्णधार विराट कोहलीने म्हटले.
विराट कोहली म्हणतो की, मला धक्का बसलेला नाही, उलट संघाने दिलेल्या कडव्या प्रत्युत्तरावर समाधानी आहे. संघात प्रत्येकाने बजावलेल्या कामगिरीवर मी खूश आहे. सामन्यात गोलंदाजांनी उत्तम कामगिरी बजावली. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अमित मिश्राने आपल्या दहा षटकांत केवळ २८ धावा दिल्या आणि दोन विकेट्स घेतल्या. त्याने मिसबा, हफीज, उमर अकमल, शाहीद आफ्रिदी यांच्याविरुद्ध उत्तम गोलंदाजी केली. अमितने प्रत्येकवेळी मला प्रभावित केले आहे. असेही कोहली म्हणाला.