BCCI writes letter to all state associations: बीसीसीआयने आगामी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. प्रथमच एकट्या भारताने या मेगा इव्हेंटचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा देशातील १२ वेगवेगळ्या ठिकाणी खेळवली जाणार आहे. अशा परिस्थितीत बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर विश्वचषक सामन्यांचे आयोजन करणाऱ्या सर्व १० राज्य संघटनांना पत्र लिहून विशेष आवाहन केले आहे.

सचिव जय शाह यांनी २८ जून रोजी राज्य क्रिकेट संघटनांना पत्र लिहिल्यानंतर बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये शाह यांनी सांगितले आहे की २०२३ च्या विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर होण्याच्या एक दिवस आधी २६ जून रोजी झालेल्या बैठकीत त्यांनी या सर्व १० राज्यांच्या क्रिकेट संघटनांना विनंती केली होती. त्यानंतर शाह यांनी नमूद केले की त्यांची विनंती सर्व संबंधित राज्य युनिट्सनी “एकमताने” मान्य केली आहे.हैदराबाद, अहमदाबाद, धर्मशाला, दिल्ली, चेन्नई, लखनऊ, पुणे, बंगळुरू, मुंबई आणि कोलकाता ही १० विश्वचषक स्थळे आहेत. स्पर्धेचे सराव सामने २९ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर दरम्यान गुवाहाटी (४) आणि तिरुवनंतपुरम (४), हैदराबाद (२) येथे खेळवले जातील.

jyoti surekha vannam
ज्योतीची सुवर्ण हॅट्ट्रिक;  विश्वचषक तिरंदाजीमध्ये कम्पाऊंड प्रकारात भारताला पाच पदके
Deepika Kumari in the semi finals of the Archery World Cup sport
दीपिका कुमारी उपांत्य फेरीत; विश्वचषक तिरंदाजीत भारताची चार पदके निश्चित
Dinesh Karthik Says I won't be surprised if he crosses the 300 run mark in IPL
IPL 2024 : आयपीएलमध्ये लवकरच ३०० धावांचा टप्पा पार होणार, ‘या’ दिग्गज खेळाडूची मोठी भविष्यवाणी
Bernd Holzenbein dead at 78
माजी फुटबॉलपटू होल्झेनबाइन यांचे निधन

बीसीसीआय सचिवांनी लिहिले की,“आमच्या बैठकीदरम्यान, मी आयसीसी विश्वचषक २०२३ च्या सामन्यांचे न्याय्य वितरण सुनिश्चित करण्यासाठी एक उपाय प्रस्तावित केला. मी आसाम क्रिकेट असोसिएशन आणि केरळ क्रिकेट असोसिएशन वगळता यजमान संघटनांना विनंती केली होती, ज्यांना सराव सामने देण्यात आले होते, त्यांनी द्विपक्षीय आंतरराष्ट्रीय हंगामात एकदिवसीय सामन्यांचे यजमानपद स्वेच्छेने सोडावे. २०२३ च्या विश्वचषक हंगामासाठी दुर्दैवाने सामन्यांचे आयोजन करणार्‍या राज्य संघटनांना सामावून घेण्यासाठी हा प्रस्ताव ठेवण्यात आला होता.”

हेही वाचा – Saeed Ajmal: हरभजन आणि आश्विनच्या बॉलिंग ॲक्शनबद्दल पाकिस्तानच्या माजी खेळाडूच मोठं वक्तव्य; म्हणाला, “त्यांची मेडिकल कंडीशन…”

त्यानंतर शाह यांनी नमूद केले की त्यांची विनंती सर्व विश्वचषक स्टेजिंग युनिट्सनी स्वीकारली आहे. “मला तुम्हाला कळवण्यात आनंद होत आहे की, या प्रस्तावाला सर्व सहभागी संघटनांकडून एकमताने संमती आणि पाठिंबा मिळाला आहे. हा निर्णय क्रिकेट बंधूंमधील सहकार्य आणि एकतेची भावना प्रतिबिंबित करतो, २०२३ विश्वचषकाच्या एकूण यशाला प्राधान्य देतो आणि एक समान संधीची खात्री देते.”

हेही वाचा – IND vs PAK: धोनीच्या ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कारावर पाकिस्तानच्या माजी खेळाडूने उपस्थित केला सवाल; म्हणाला, “त्याने दोन झेल…”

मोहाली, नागपूर, राजकोट, इंदूर, रांची, विझाग, रायपूर आणि कटक हे २०२३ विश्वचषक सामन्यांच्या ठिकाणांच्या यादीतून वगळले गेले आहेत, परंतु आता या स्थळांवर आगामी हंगामात आणखी द्विपक्षीय सामने आयोजित करण्याची अपेक्षा केली जाऊ शकते.