Farid Hussain: जम्मू आणि काश्मीरचा क्रिकेटपटू फरीद हुसेनचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा अपघात २० ऑगस्टला झाला होता. या थरारक अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा क्रिकेटपटू आपल्या स्कूटीहून जात होता, इतक्यात अचानक कार चालकाने गाडीचं दार उघडल्याने त्याला धक्का लागला आणि तो जमिनीवर आदळला.

इंडिया टूडेने दिलेल्या वृत्तानुसार, फरीद हुसेनचा मृत्यू २० ऑगस्टला झाला आहे. मात्र, या भयानक अपघाताचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. फावद हुसेन हा जम्मू- काश्मीरमधील स्टार खेळाडूंपैकी एक होता. मात्र, अचानक झालेल्या या अपघातामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. फरीद हुसेन जाणार इतक्यात कार चालकाने दार उघडलं त्यामुळे फरीद हुसेन जमिनीवर आदळला.

नेमकं काय घडलं?

तर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक पांढऱ्या रंगाची कार रस्तेच्या कडेला उभी आहे. त्यावेळी फरीद हुसेन आपल्या स्कूटीवरून जात होता. आधी कारचा दरवाजा बंद होता. पण जसं फरीद हुसेन जवळ पोहोचला, नेमकं त्याचवेळी कार चालकाने मागे कोणी आहे का, हे न पाहताच दार उघडला. त्यामुळे कारचा दरवाजा आणि फरीद हुसेनच्या स्कूटरची दोरदार धडक झाली. त्यामुळे तो आपल्या स्कूटीसह जमिनीवर आदळला. स्कूटरहून पडल्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली. ही धडक इतकी जोरदार होती की, जमिनीवर आदळताच फरीद हुसेन बेशुद्ध झाला.

ही घटना घडल्यानंतर स्थानिकांनी धाव घेत फरीद हुसेनला दवाखान्यात नेलं. डॉक्टरांनी त्याला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मात्र, शनिवारी त्याने जगाचा निरोप घेतला. पोलिसांनीही या घटनेचा तपास करायला सुरूवात केली आहे. मात्र या दुर्घटनेचं नेमकं कारण काय, हे व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.