पाकिस्तान क्रिकेट संघाच्या गेल्या काही मालिकांमध्ये निराशाजनक कामगिरीचे खापर पाकचे माजी क्रिकेटपटू जावेद मियाँदाद यांनी पाक क्रिकेट बोर्डाने नियुक्त केलेल्या परदेशी प्रशिक्षकांवर फोडले आहे. पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डाने पाक संघामध्ये सुधारणा करण्यासाठीच्या दृष्टीकोनातून लाहोरमध्ये दोन दिवसीय बैठकीचे आयोजन कण्यात आले असून यामध्ये पाकच्या माजी क्रिकेटपटूंना आमंत्रित करण्यात आले आहे. पण पाक क्रिकेट बोर्डाने घेतलेल्या या पुढाकारावरही त्यांनी टीका केली. मियाँदाद म्हणाले की, पाक बोर्डाने आयोजित केलेल्या विचार बैठकीची मला कल्पना देखील नाही. वर्तमान पत्रात आलेल्या बातमीतून मला याची माहिती मिळाली. आमंत्रितांमध्ये आपल्यालाही बोलविण्यात आल्याचेही बातमीत नमूद करण्यात आलेले आहे. पण पाक बोर्डाकडून अद्याप माझ्याकडे कोणताही संपर्क साधण्यात आलेला नाही. संघाच्या प्रशिक्षकपदासाठी कोट्यवधी पैसा खर्चून विदेशी प्रशिक्षक नेमणाऱया बोर्डाची बैठक मला अजिबात महत्त्वाची वाटत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Javed miandad blames foreign coaches for pak poor performance
First published on: 08-02-2017 at 19:50 IST