प्राणघातक हल्ल्याची शिकार ठरलेला जेसी रायडरला रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहे. न्यूझीलंडमधील एका बारमधून बाहेर पडत असताना काही व्यक्तींनी रायडरवर प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यात रायडरच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्या होत्या. कोमातून बाहेर पडल्यानंतर रायडरला तीन दिवस अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते.
‘रायडरला बुधवारी रुग्णालयातून सोडण्यात आले असून आणि लवकरच तो वेलिंग्टनला परतेल’, असे रायडरचे व्यवस्थापक आरोन क्ली यांनी सांगितले. रायडर खूप थकला आहे, मात्र घरी परतल्याने तो आनंदित असल्याचेही क्ली यांनी पुढे सांगितले.
दरम्यान रायडरवरील हल्ल्यासंदर्भात न्यूझीलंड पोलिसांनी दोन व्यक्तींना अटक केली आहे.