इंग्लंडच्या संघाने लॉर्ड्स कसोटीत जो रूटच्या शतकाच्या जोरावर पहिल्य डावात ३८७ धावांचा डोंगर उभारला. जो रूटने पहिल्या डावात संयमी आणि प्रसंगी आक्रमक फटके खेळत ३७वं कसोटी शतक झळकावलं. रूटने १९९ चेंडूत १० चौकारांसह १०४ धावा करत बाद झाला. बुमराहने कमालीच्या चेंडूवर रूटला क्लीन बोल्ड केलं. यानंतर भारताच्या डावात रूटने कमालीचा झेल टिपत करूण नायरला बाद केलं आहे.

जो रूट हा स्लिपमधील एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे. रूटने स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करताना अनेक झेल टिपले आहेत. भारताविरूद्ध पहिल्या डावातही त्याने कमालीचा झेल टिपला आहे. रूटच्या या कॅचचा व्हीडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

इंग्लंडच्या कसोटी संघाचत जोफ्रा आर्चरन ४ वर्षांनंतर पुनरागमन केलं आहे. आर्चरने पुनरागमनानंतर पहिल्याच षटकात विकेट मिळवली आहे. आर्चरने यशस्वी जैस्वालला झेलबाद करवत ही विकेट मिळवली. यानंतर करूण नायर आणि केएल राहुल यांनी ६१ धावांची भागीदारी रचत भारताचा डाव सावरला. पण टीब्रेकनंतर बेन स्टोक्सने त्याला झेलबाद केलं. ज्यामध्ये जो रूटची भूमिका खूप महत्त्वाची होती.

बेन स्टोक्स टीब्रेकनंतर २१वं षटक टाकण्यासाठी आला. स्टोक्सच्या षटकातील दुसरा चेंडू खेळण्यासाठी करूण नायरने बॅट पुढे केली, तितक्यात चेंडू बॅटची कड घेत स्लिपच्या दिशेने गेला. जिथे रूट तैनात होता आणि त्याने डाव्या बाजूला वाकून पायाच्या बोटांवर आपा तोल सावरत कमालीचा झेल टिपला. रूटने चेंडू आल्यावर फार उशिरा हात पुढे सरसावला. तरीही त्याने कमालीचा चेंडू टिपला आणि करूण नायरला बाद केलं.

रूटने झेल टिपल्याने राहुल-करूणची ६१ धावांची भागीदारी तुटली. तर पुन्हा एकदा चांगल्या सुरूवातीनंतर करूण नायर ६२ चेंडूत४ चौकारांसह ४० धावा करत बाद झाला. पहिल्या डावात इंग्लंडने ३८७ धावा केल्या आहेत. त्यामुळे भारतीय संघ आता पहिल्या डावात किती धावा करणार यावर सर्वांच्या नजरा आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जो रूटने करूण नायरला झेलबाद करत संघाला विकेट मिळवून दिलीच. पण त्याने यासह मोठा विश्वविक्रम रचला आहे. जो रूट हा कसोटी इतिहासात सर्वाधिक २११ झेल टिपणारा पहिला खेळाडू ठरला आहे. त्याने राहुल द्रविडला मागे टाकत हा विक्रम आपल्या नावे केला आहे.