IND vs ENG 3rd T20I Updates in Marathi: भारत-इंग्लंड तिसऱ्या टी-२० सामन्यात इंग्लंडने भारताला विजयासाठी १७२ धावांचे लक्ष्य दिले आहे. या संपूर्ण मालिकेत इंग्लंडकडून जोस बटलरने उत्कृष्ट कामगिरी करत संघासाठी धावा केल्या आहेत. यासह आता तिसऱ्या टी-२० मध्ये बटलरने नवा विक्रम आपल्या नावे केला. त्याने अवघ्या १८ धावा करत एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला.

जोस बटलरने भारताविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात १८ धावा पूर्ण करताच त्याने एक मोठा विक्रम रचला. बटलर तिसऱ्या टी-२० सामन्यात अवघ्या २४ धावा करत बाद झाला पण त्याने विक्रम मात्र त्याने आपल्या नावे केला आहे. बटलर हा भारतीय भूमीवर सर्वाधिक टी-२० आंतरराष्ट्रीय धावा करणारा फलंदाज ठरला आहे.

त्याने अफगाणिस्तानच्या मोहम्मद नबीला मागे टाकले, ज्याने २५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ५५६ धावा केल्या. आता जोस बटलर हा टी-२० मध्ये भारतात सर्वाधिक धावा करणारा विदेशी फलंदाज बनला आहे. त्याने २०व्या टी-२० सामन्यात ५५७* धावा केल्या आहेत. या प्रकरणात, दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डी कॉक तिसऱ्या स्थानावर आहे, ज्याने १२ टी-२० सामन्यांमध्ये ४५८ धावा केल्या आहेत. ग्लेन मॅक्सवेल ४४५ धावांसह चौथ्या आणि मोहम्मद शेहजाद ४३५ धावांसह पाचव्या स्थानावर आहे.

भारतात T20I मध्ये सर्वाधिक धावा करणारा विदेशी फलंदाज

१. जोस बटलर – ५५७* धावा (२० टी-२० सामने)
२. मोहम्मद नबी – ५५६ धावा (२५ टी-२० सामने)
३. क्विंटन डी कॉक – ४५८ धावा (१२ टी-२० सामने)
४. ग्लेन मॅक्सवेल – ४४५ धावा (१४ टी-२० सामने)
५. मोहम्मद शेहजाद – ४३५ धावा (१३ टी-२० सामने)

भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये जोस बटलरने चमकदार कामगिरी केली आहे. त्याने दोन्ही सामन्यात इंग्लंडकडून सर्वाधिक धावा केल्या. त्याने दोन सामन्यांत ५६ च्या सरासरीने ११३ धावा केल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात बटलरने ६८ धावा केल्या. यानंतर चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात त्याने ४५ धावा केल्या. मात्र, त्याच्या या कामगिरीनंतरही इंग्लंड संघाला मालिकेत आतापर्यंत एकही सामना जिंकता आलेला नाही. तर तिसऱ्या टी-२० सामन्यात २४ धावांची खेळी केली आणि भारताला १७२ धावांचे लक्ष्य दिले आहे.