India vs Australia 2nd Test: भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचे सामने खेळवले जात आहेत. टीम इंडियाने ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना २९५ धावांनी जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आता उभय संघांमधील दुसरा सामना ६ डिसेंबरपासून ॲडलेड ओव्हलवर खेळवला जाईल, जो गुलाबी चेंडूचा कसोटी सामना असेल. यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघाला मोठा धक्का बसला असून मिचेल स्टार्कनंतर अजून एक मुख्य खेळाडू संघाबाहेर झाला आहे.

मिचेल मार्शच्या दुखापतीमुळे चिंतेत असलेल्या ऑस्ट्रेलियाला जोश हेझलवुडच्या रूपात अजून एक धक्का बसला आहे. हेझलवूड दुसऱ्या रात्र दिवस कसोटी सामन्यातून बाहेर धाला आहे. पर्थ कसोटीत ६ विकेट घेणाऱ्या हेजलवूडला दुखापत झाली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने हेझलवूडच्या जागी दुसऱ्या खेळाडूचे नाव जाहीर केले आहे. सीएने सांगितले की, ६ डिसेंबरपासून ॲडलेड ओव्हल येथे होणाऱ्या दिवस-रात्र कसोटीसाठी सीएन ॲबॉट आणि ब्रेंडन डॉगेट यांचा संघात समावेश करण्यात आला आहे.

हेही वाचा – IND vs PAK: आज होणारा भारत-पाकिस्तान मुकाबला कुठे लाईव्ह पाहता येणार? जाणून घ्या वेळ आणि चॅनेल

हेझलवूडच्या जागी ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या कसोटीत संघाचा भाग असलेल्या स्कॉट बोलंडचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश होण्याची शक्यता आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२४ च्या अंतिम सामन्यात बोलंडने भारताविरुद्ध शानदार गोलंदाजी केली होती. जुलै २०२४ नंतर तो एकही कसोटी सामना खेळलेला नाही.

हेही वाचा – IND vs AUS: ऑस्ट्रेलियाने पर्थ कसोटी पराभवानंतर संघात केला मोठा बदल, ‘या’ अष्टपैलू खेळाडूला दिली संधी; दुसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर

हेजलवूडची अनुपस्थिती हा ऑस्ट्रेलियासाठी मोठा धक्का आहे. महत्त्वाचं म्हणजे हेझलवुड हा ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजी विभागाचा मुख्य गोलंदाज आहे. त्याने पर्थ कसोटीत पहिल्या डावात सर्वाधिक ५ विकेट्स घेत भारतीय संघाच्या फलंदाजांना जेरीस आणले. त्याने पहिल्या डावात २९ धावांत ४ विकेट घेतले, ज्यामुळे भारताला कांगारू संघाने १५० धावांवर सर्वबाद केले. दुसऱ्या डावात त्याने २१ षटकांत २८ धावा देत १ विकेट घेतली. यापूर्वी भारत वि ऑस्ट्रेलियाच्या ॲडलेडमध्ये झालेल्या सामन्यात हेझलवूड ऑस्ट्रेलियाच्या सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक होता. त्याने पाच षटकात ८ धावा देत ५ विकेट घेतले होते. जेव्हा भारत ३६ धावांवर सर्वबाद झाला.

हेही वाचा – Champions Trophy: “२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान…”, शाहीद आफ्रिदीने BCCI ला सुनावलं, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या मुद्द्यावरून मोठं वक्तव्य

दुसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, मिच मार्श, नॅथन मॅकस्वीनी, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, ब्यू वेबस्टर, शॉन ॲबॉट आणि ब्रेंडन डॉगेट