Jyulius baer chess competition final first round Carlson won ysh 95 | Loksatta

ज्युलियस बेअर बुद्धिबळ स्पर्धा : अंतिम फेरीतील पहिल्या लढतीत कार्लसनची अर्जुनवर मात

विश्वातील अव्वल बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसनने आपले वर्चस्व अधोरेखित करताना ज्युलियस बेअर जनरेशन चषक बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीतील पहिल्या लढतीत भारताचा ग्रँडमास्टर अर्जुन एरिगेसीवर मात केली.

ज्युलियस बेअर बुद्धिबळ स्पर्धा : अंतिम फेरीतील पहिल्या लढतीत कार्लसनची अर्जुनवर मात
ज्युलियस बेअर बुद्धिबळ स्पर्धा

पीटीआय, न्यूयॉर्क : विश्वातील अव्वल बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसनने आपले वर्चस्व अधोरेखित करताना ज्युलियस बेअर जनरेशन चषक बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीतील पहिल्या लढतीत भारताचा ग्रँडमास्टर अर्जुन एरिगेसीवर मात केली. या ऑनलाइन जलद बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीतील दोन लढतींपैकी पहिली लढत जगज्जेत्या कार्लसनने २.५-०.५ अशा फरकाने जिंकली. त्यामुळे जेतेपदाच्या आशा कायम राखण्यासाठी अर्जुनने चार डावांची दुसरी लढत जिंकणे अनिवार्य आहे. अर्जुनने दुसऱ्या लढतीत विजय मिळवल्यास अंतिम विजेता ठरवण्यासाठी टायब्रेकरचा अवलंब केला जाईल. मात्र, कार्लसनने दुसऱ्या लढतीतही बाजी मारल्यास तो या स्पर्धेचे विजेतेपद मिळवेल.

अंतिम फेरीतील पहिल्या लढतीच्या पहिल्या डावापासूनच कार्लसनने अप्रतिम खेळ केला. पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळताना कार्लसनने पहिला डाव ४० चालींमध्ये जिंकला. दुसऱ्या डावात त्याने अर्जुनवर अधिक दडपण टाकले आणि २९ चालींअंती विजय नोंदवला. १९ वर्षीय अर्जुनने तिसऱ्या डावात खेळात सुधारणा करत कार्लसनला बरोबरीत रोखले. मात्र, त्याला विजय मिळवण्यात अपयश आल्याने कार्लसनने अंतिम फेरीतील पहिली लढत २.५-०.५ अशी जिंकली.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
विक्रमी वेळेसह किपचोगे बर्लिन मॅरेथॉनचा विजेता

संबंधित बातम्या

‘संस्काराच्या शिदोरीतील उत्तम गुणदर्शन’! पाकिस्तानच्या रावलपिंडी मैदानात जो रूटने असं काही केलं…; Video होतोय तुफान Viral
IND vs BAN: वनडे मालिकेसाठी मोहम्मद शमीच्या बदली खेळाडूची घोषणा, ‘या’ गोलंदाजाला मिळाली संधी
FIFA World Cup 2022: आजपासून सुपर-१६ लढतींचा थरार, पाहा सर्व सामन्यांचे वेळापत्रक
VIDEO: चेंडू चमकवण्यासाठी जो रुटने लढवली अजब शक्कल; चक्क! ‘जॅक लीचच्या…’
‘आगामी वन-डे विश्वचषकात ऋतुराज गायकवाड नक्की दिसेल’; प्रशिक्षक मोहन जाधव यांचा विश्वास

व्हिडिओ

ताज्या बातम्या
लग्नाच्या १८ वर्षानंतर कलाकार दाम्पत्य झाले आई-बाबा; व्हिडीओ शेअर करत म्हणाले…
लोकलमध्ये जागा न मिळाल्याने महिलेने थांबवली ट्रेन; अन् त्यानंतर जे झालं…’ पाहा हा व्हिडीओ
‘संस्काराच्या शिदोरीतील उत्तम गुणदर्शन’! पाकिस्तानच्या रावलपिंडी मैदानात जो रूटने असं काही केलं…; Video होतोय तुफान Viral
VIDEO: चेंडू चमकवण्यासाठी जो रुटने लढवली अजब शक्कल; चक्क! ‘जॅक लीचच्या…’
“संजय राऊतांना पिसाळलेल्या कुत्रा चावला आहे,” शिंदे गटातील आमदाराची सडकून टीका