भारतीय क्रिकेटर्स आणि बॉलिवूडचं नातं तसं काही नवीन नाही. अनेक भारतीय क्रिकेटर्स आणि बॉलिवूड अभिनेत्रींचे संबंध राहिले आहेत. यामधील काहीजण विवाहबंधनातही अडकले. विराट कोहली, हरभजन सिंग, युवराज सिंग यांचं हे नातं लग्नापर्यंत पोहोचलं. भारतीय क्रिकेटर्सच्या या यादीत आता अजून एक नाव जोडलं गेलं आहे ते म्हणजे के एल राहुल. के एल राहुलला नुकतंच बॉलिवूड अभिनेत्री निधी अग्रवालसोबत एका हॉटेलमध्ये पाहिलं गेलं. यानंतर दोघे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सुरु झाली आहे. निधी अग्रवालने टायगर श्रॉफसोबत ‘मुन्ना मायकल’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिळालेल्या माहितीनुसार, के एल राहुल निधी अग्रवालसोबत मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये गेला होता. तेथून बाहेर पडताना काहीजणांनी त्याला पाहिलं. दोघांचे बाहेर पडतानाचे फोटोही काहीजणांनी क्लिक केले आहेत. इन्स्टाग्रामवर के एल राहुलच्या फॅन पेजवर दोघांचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. या फोटोत दोघेही रेस्टॉरंटमध्ये एकमेकांची सोबत एन्जॉय करताना दिसत आहेत.

आयपीएल संपल्यामुळे के एल राहुल आता आपल्या पुढील दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. अफगाणिस्तानविरोधातील कसोटी सामन्यासाठी के एल राहुल बंगळुरुला रवाना होणार आहे. १४ जूनला चिन्नास्वामी स्टेडिअमवर हा सामना होईल.

आयपीएलच्या या हंगामात के एल राहुलने अत्यंत जबरदस्त कामगिरी केली. १४ सामन्यात ५४.९१ च्या सरासरीने के एल राहुलने ६५९ धावा ठोकल्या. दिल्लीविरोधातील पहिल्या सामन्यात के एल राहुलने सर्वात जलद अर्धशतक ठोकलं होतं. सहा चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने के एल राहुलने १६ चेंडूत ५१ धावा ठोकल्या. हा आपला सर्वात आवडता क्षण होता असंही त्याने सांगितलं होतं.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: K l rahul seen with bollywood actress nidhhi agerwal
First published on: 31-05-2018 at 15:14 IST