जामसंडे येथे सुरू असलेल्या छत्रपती शिवाजी करंडक कबड्डी स्पर्धेत मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी यांनी पुरुष विभागात, तर कोल्हापूर, यवतमाळ, अमरावती, नागपूर संघांनी महिला विभागात आगेकूच केली आहे.
पुरुषांच्या ‘अ’ गटात मुंबई उपनगरने नंदुरबारचा ४०-१२ असा धुव्वा उडवला. शैलेश गारळे, योगेश सावंत यांच्या चढाया, त्याला मिळालेली अमर निकाते, सुदेश कुळे यांच्या पकडीची साथ यामुळे हे शक्य झाले.
नंदुरबारचा निवृत्ती जगताप एकाकी लढला. ‘ड’ गटात मुंबईने नागपूरला २२-१० असे पराभूत केले. श्रीभारतीचा अष्टपलू खेळ त्याला संकेत सावंतच्या चढाया व नितीन विचारेची पकडीची
साथ यामुळे मुंबईने हा विजय साकारला.
रायगडने चंद्रपूरचा २६-१४ असा पाडाव केला. राजन तांडेल, अनिकेत पाटील यांच्या चढाया, तर अनिकेत कोटेकर याच्या पकडी रायगडच्या विजयात महत्त्वाच्या ठरल्या.
महिलांच्या ‘ड’ गटात नागपूरने रायगडचा ४७-२४ असा पराभव केला. नागपूरकडून निकिता इंगळे, प्रियंका गजभिये यांच्या चढाया, तर निकिता तांदुरकरच्या पकडी या महत्त्वाच्या ठरल्या. रायगडकडून रेश्मा जाधव, प्रगती मुसळे यांनी कडवी झुंज दिली, परंतु त्यांना विजय मिळवण्यात अपयश आल़े
संग्रहित लेख, दिनांक 10th Mar 2015 रोजी प्रकाशित
मुंबई, रायगडचे दमदार विजय
जामसंडे येथे सुरू असलेल्या छत्रपती शिवाजी करंडक कबड्डी स्पर्धेत मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी यांनी पुरुष विभागात, तर कोल्हापूर, यवतमाळ, अमरावती, नागपूर संघांनी महिला विभागात आगेकूच केली आहे.
First published on: 10-03-2015 at 05:56 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kabaddi mumbai raigad